मतदार यादीत नाव कसे शोधावे ?
How to find your name in Electoral Roll /Voter List
मतदारयादीत
नाव शोधण्यासाठी सर्वप्रथम निवडणूक आयोग (Election Commission) च्या खालील वेबसाईट
वर जावे :
उजव्या
हाताला Services मध्ये
Search in Electoral Roll ला
क्लिक करा
Search in Electoral Roll
ची
विंडो
ओपन
होईल.
ह्या मध्ये तुम्हाला ३ पर्याय मिळतील.
१. ईपीआईसी द्वारा खोजें / Search by EPIC
२. विवरण
द्वारा खोजें/ Search by Details
३. मोबाइल
द्वारा खोजें / Search by Mobile
१. ईपीआईसी द्वारा खोजें / Search by EPIC : तुमच्या मतदार ओळखप्रमाणपत्र च्या क्रमांकानुसार तुम्ही
तुमचे नाव मतदार यादीत
तपासू शकता.
ईपीआईसी
संख्या/ EPIC Number *
:-
तुमच्या मतदार ओळखपत्र क्रमांक टाकून तुमचे राज्य सिलेक्ट करा.
खाली
captcha टाकून
submit करा.
2. विवरण
द्वारा खोजें/ Search by Details
हा पर्याय सर्वात किचकट आहे. अगदी तंतोतंत
माहिती भरली तर हिथे
तुम्हाला मतदार यादीत नाव मिळेल.
- भाषा
निवडा
- मग
आपले नाव टाका पुढे
वडिलांचे किंवा पतीचे नाव टाका
- मग
तुमची जन्मतारीख टाका व लिंग
निवडा.
- खाली
location details मध्ये
तुमचा जिल्हा आणि विधानसभा क्षेत्र
निवड करा.
- खाली
captcha योग्य भरून Search ला क्लिक करा.
3. मोबाइल द्वारा खोजें / Search by Mobile
हा सर्वात चांगला आणि सोपा उपाय आहे. जर तुमचा मोबाईल नंबर नोंदणीकृत केला असले तर सहज तुम्हाला मतदारयादीत नाव भेटेल.
- प्रथम राज्य सिलेक्ट करा. व त्यानंतर भाषा निवडा
- तुमचा नोंदणी केलेला मोबाईल नंबर टाका.
- त्यानंतर Captcha टाका. आणि OTP साठी क्लिक करा.
- आलेला OTP नोंदवा आणि Search वर क्लिक करा.
वरील तिन्ही पद्धतीने तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत शोधू शकता. त्यानंतर तुमच्या मतदारयादीतील माहिती प्रकाशित होईल. त्याची pdf सेव्ह करा. आणि मोबाईल मध्ये ठेवा. ती तुम्ही मतदार केंद्रावर दाखवू शकता.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
मतदान बूथ स्लिपसाठी एसएमएस सुविधा
ECI <space> (तुमचा मतदार आयडी) 1950 वर पाठवा
उदाहरणार्थ:
ECI XYZ1234567
1950 वर पाठवा
15 सेकंदात तुम्हाला बूथ स्लिप मिळेल.
0 टिप्पण्या