आनंदाचे विज्ञान | Science Behind Happiness
नुकतीच आपण दिवाळी साजरी केली. नवीन दिवाळी अँथेम " दिन दिन दिवाळी " पण चांगलच गाजतंय.
"आनंदाचं झाड आनंदाच्या डहाळी "
खरंच आनंदच झाड असलं असत
तर , फांद्या फांद्यावरून आनंदाचे क्षण तोडून आणले
असते आपण . . कारण
आनंदी राहणे कोणाला आवडत नाही. प्रत्येकजण
आयुष्यात जी धडपड करतो
, पैश्याच्या मागे धावतो ते
फक्त आनंद मिळवण्यासाठीच. म्हणून
म्हटलं असे आनंदाचं झाड
असलं असतं तर मनुष्यप्राणी
त्यावर तुटून पडला असता.
आनंदाचं
झाड अस्तित्वात नसलं म्हणून काय
झालं , आनंदी राहायचे खूप सारे मार्ग
आहेत. आपल्या संत मंडळींनी अध्यात्म्यात
बरच काही सांगून ठेवलं
आहे . पण हे आधुनिक
युग आहे हिथे लोकांना
प्रत्येक गोष्टीत विज्ञान लागत. Science लागतं. आहे आनंदी कस
राहायचं याच सुद्धा सायन्स
आहे. आनंदाच विज्ञान काय आहे ते
पाहूया ह्या ब्लॉग मध्ये.
आनंदी
राहायचे , आपला मूड चांगला
करायचे वैज्ञानिक आणि सोपे उपाय
तुम्हाला सांगतो. त्या मागच्या विज्ञानासकट
१. व्यायाम :
सकाळी
लवकर उठून व्यायाम करणारी
माणसं निरोगी
असतात असं आपल्याला कित्येक
वर्षांपासून सांगण्यात आलं आहे. असं
का होत ह्याच वैज्ञानिक
कारण आहे. व्यायाम केल्याने
, कसरत केल्याने , खेळल्यामुळे आपल्या शरीरात "एंडोमॉर्फीन"
(endorphins) हे हार्मोन जास्त प्रमाणात तयार होते. "एंडोमॉर्फीन"
(endorphins) ह्या हार्मोन ला "फील गुड हार्मोन"
( Feel good Hormones ) असं
सुद्धा म्हणतात. दररोज थोडस चालणं किंवा
थोडासा व्यायाम अथवा योगा केला
तरी आपल्या मूड ला एक
छानसा बूस्ट मिळू शकतो. तुम्ही
नक्कीच अनुभवाला असेल हे.
"एंडोमॉर्फीन"
(endorphins) हे एक अजब आकर्षक
हार्मोन्स आहे. ते सेंट्रल
नर्वस सिस्टिम म्हणजेच मध्यवर्ती मज्जासंस्था आणि पिट्यूटरी ग्रंथीद्वारे
तयार होणारे न्यूरोट्रांसमीटर आहे. ह्या हार्मोन्सचं
अजून एक वैशिष्ट्य म्हणजे
ते नॅचरल पेनकिलर ( Natural
Painkiller) आहेत. ते तुमच्या मेंदूतील
रिसेप्टर्सशी संवाद साधतात ज्यामुळे तुमची वेदना कमी होते. मॉर्फीन
जस काम करत तसचं
पण "एंडोमॉर्फीन"
(endorphins) शरीरात सकारात्मक भावना देखील उत्तेजित करतात. ज्यामुळे आपला मूड चांगला होतो आणि आनंदी
राहतो.
"एंडोमॉर्फीन"
(endorphins) वाढवण्याचे
काही सोपे उपाय :
Ø
"एंडोमॉर्फीन"
(endorphins) चे प्रमाण वाढवण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे व्यायाम
, विशेषतः "धावणे" .
Ø
हसण्याने
सुद्धा एंडोमॉर्फीन ला चालना मिळते.
बऱ्याचदा एकदा विनोदी सिनेमा
पाहिला कि आपल्याला फील
गुड वाटते ते ह्यामुळेच.
Ø
काही
विशिष्ट खाद्य पदार्थ जसे कि डार्क
चॉकलेट किंवा झणझणीत तिखट असे काहीतरी
खाल्लं कि एंडोमॉर्फीन चा
रिलीज ट्रिगर होतो.
२. ध्यान म्हणजेच मेडिटेशन ( Meditation ) : ध्यान धारणेने मनावरील तणाव आणि चिंता
दूर होते हे सर्वमान्य
सत्य आहे. कित्येक संशोधनातून
हे सिद्ध झाले आहे कि
नियमित ध्यान केल्याने ( Meditation ) मन
तणावमुक्त होते आणि मूड
चांगला राहतो. विशेषतः भावनिक आरोग्य उत्तम राहते.
३. सोशल कनेक्शन : आनंदी
राहायचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी
उपाय म्हणजे सोशल कनेक्शन ! अर्थात
लोकांसोबत संवाद . आपल्या परिवारासोबत , मित्रांसोबत थोडा वेळ घालवल्याने
मूड कसा छान होऊन
जातो. अगदी पाळीव प्राण्यांसोबत
थोडं खेळलात तरी तुमचं मन
प्रसन्न होऊन जाईल. ह्या
मागचं विज्ञान
असं कि अश्या कनेक्शनमुळे
शरीरात " ऑक्सिटॉसिन" (oxytocin) तयार होत असते.
ज्याला " लव्ह हार्मोन्स " (Love Hormones) असे सुद्धा म्हणतात.
ह्या नावातच सर्व आलं.
सर्व
दुःखावरचे रामबाण औषध म्हणजे मित्र.
मित्रांच्या गप्पाच्या मैफिली मोठ्या मोठ्या संकटाना समोर जायची ताकद
देतात त्या उगाच नाही. जगात
असं कोणतच दुःख नाही जे
मित्रांच्या संगतीत कमी होत नाही.
"ऑक्सिटोसिन"
( Oxytocin) सुद्धा एक भारी हार्मोन्स
आहे. त्याला " लव्ह हार्मोन्स" किंवा
" कडल केमिकल " ( Cuddle
Chemical ) असं सुद्धा ओळखलं जातं. ते हायपोथॅलॅमस ग्रंथीत
तयार होते आणि पिट्युटरी
ग्लॅन्ड मधून शरीरात सोडले
जाते. "ऑक्सिटोसिन" ( Oxytocin)
ला भारी हार्मोन्स का
बोललो त्याची कारणे :
नातेसंबंध :
"ऑक्सिटोसिन"
( Oxytocin) हे नातेसंबंध , विश्वास , बॉण्डिंग , सामाजिक वर्तन ह्या सर्वात फार
महत्वाचा रोल प्ले करतो.
रिलेशनशिप मध्ये विश्वास आणि जवळीक ह्या
हार्मोन्समुळे तयार
होते. सर्वात महत्वाचं म्हणजे लहान बाळांमध्ये आणि
त्यांच्या आई मध्ये बॉण्डिंग
ला हेच हार्मोन्स उपयुक्त
असतात. बाळाच्या जन्माच्या वेळी आणि त्याला
दूध पाजताना हे हार्मोन्स सर्वात
जास्त तयार होतात. म्हणून
आई साठी तीच बाळ
सर्वस्व असते . जगात सर्वात जास्त
घट्ट बॉण्डिंग आईचं तिच्या
बाळा सोबत असत.
ताणतणाव कमी करणे:
"ऑक्सिटोसिन" ( Oxytocin)
हे तणाव आणि चिंता
पातळी कमी करण्यास मदत
करू शकते, शांत आणि निरोगीपणाची
भावना वाढवते.
शाररिक स्पर्श :
आपल्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारणे , हाथ
हाथात घेणे या सारख्या
शाररिक स्पर्शाने ऑक्सिटोसिन क्रियाशील होते. दुखऱ्या मनावर फुंकर घालायची असेल तर एक
मस्तपैकी झप्पी देणे हा किती
सोपा उपाय आहे. आपल्या
प्रियजनांना अशी घट्ट मिठी
मारणे सगळ्या दुखावरच सही औषध.
एखादं चांगलं सामाजिक काम करणे , गरजूला मदत करणे , पाळीव प्राण्यांसोबत खेळणे , सुंदर शांत असं मनाला आवडणारे संगीत ऐकणे , आपला आवडता छंद जोपासणे ह्या मुळे ऑक्सिटोसिन वाढते आणि मन आनंदी होते. कोणाला पेंटिंग करून आनंद मिळतो , कोणाला नाचून आनंद मिळतो. जायच्या त्याच्या आवडीवर सर्व निर्भर आहे. काहीही करा पण ऑक्सिटोसिन वाढवा .
तुमच्या
डेली लाईफ मध्ये ह्या
गोष्टी करून बघा. आनंदच
झाड शोधावं लागणार नाही.
अजून वाचण्यासाखे : बालपण देगा देवा
1 टिप्पण्या
झक्कक्क्कअअअअस... शब्दांची मांडणी उत्तम केलीय.....
उत्तर द्याहटवा