कधीतरी मागे वळून पाहणं पण जरुरी असतं 



कधीतरी मागे वळून पाहणं पण जरुरी असतं 



नात्यात केलेल्या गुंतवणुकीचे  रिटर्नस पाहणं पण आवश्यक असतं 



कोणत्या नात्यात डिव्हिडंट भेटला आणि 

कोणत्या नात्यात फक्त लॉसच झाला 



कधीकाळी नात्यात केलेली गुंतवणूकिची आज काय व्हॅल्यू आहे 

कोणत्या बंधातून आता एक्झिट घेतली पाहिजे



कुठे स्टॉप लॉस लावला असता तर बर झालं असत हे पण कळलं पाहिजे

आणि कुठे खरच थोडं अजून प्रयत्न केला असता तर चांगल झालं असतं हे पण जाणून घेतलं पाहिजे.


मागे वळून पाहिलं की पुढची दिशा मिळते 

काय करायला पाहिजे ह्यापेक्षा काय करायला नाही पाहिजे ह्याची जाणीव होते. 



चेहऱ्याच्या मागचा चेहरा ओळखायला, आपल्या मागून कोण काय बोलत हे पाहायला मागे वळून बघावंच लागत. पाठीवर होणारे वार रोखायला मान वळवावीच लागेल. 



जरुरी नाही दरवेळी मागून वारच होईल, कदाचित तुमचा पुढे जाणारा रथ मागून कोणी अभेद्य कवचाने तोलत असेल. मागे वळून पाहिलात तर तो दिसेल. त्याचे आभार मानायला तुला मागे वळून बघावं लागेल. 




मागे वळून बघतील्याशिवाय किती लांबचा पल्ला गाठलास हे कळणार कसं? किती मैल चाललास ते कळेल कसं? कोणाला मागे सोडलेस त्याचा पण हिशोब ठेवावा लागतो. अजून किती पुढं जायचंय हे पण ठरवावं लागेल. 



कधीतरी तूला मागे वळून पहाव लागेल! 



कारण मागे वळून पाहणारा माणूस मागे राहत नाही... तो पुढचा रस्ता अधिक शहाणपणाने निवडतो.

- अव्यक्त अभिजीत