Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

तेव्हा तरी तुला लाज वाटेलंच | You will feel ashamed then | मराठी कविता | Marathi Poem

 

"तेव्हा तरी तुला लाज वाटेलंच "


तेव्हा तरी तुला लाज वाटेलंच 

मित्रा , कधी तरी तू आरशात बघशीलच 
आरसा कधी तरी तुला तुझं खर रूप दाखवेलच 
एकदा निरखून बघ स्वतःला 
तेव्हा तरी तुला लाज वाटेलच !

दुनियेच्या दुनियादारीत तू खेळ खेळशील 
कधी नात्यांशी कधी मित्रांशी 
स्वार्थाच्या धुळीने माखलेला चेहरा 
कधी तरी धुवायला जाशील 
तेव्हा तरी तुला लाज वाटेलच !

भेटेल तुला क्षणिक सुख 
वरवरच्या आनंदात आकंठ बुडशील 
जेव्हा रडायचं असेल तेव्हा खांदा नसेल कोणाचा 
एकटा पडशील कोलमडशील  
तेव्हा तरी तुला लाज वाटेलच ! 

सत्ता , पैसा सगळं मिळेल तुला 
मिळणार नाहीत ती जिवाभावाची माणसं 
आता जे भोवती आहेत ती फक्त गिधाड 
त्यांनी लचके तोडले ना 
मग तेव्हा तरी तुला लाज वाटेलच !

तेव्हा तू कितीहि झगड
हातपाय मार , फोन फिरव
किती हि कर्तृत्वाचा पाढा गिरव 
बुडत्याचा पाय खोलात जाईलच 
तेव्हा तरी तुला लाज वाटेलच ! 

- अव्यक्त अभिजीत 


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या