लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त लहान मुलांसाठी भाषण
माननीय
शिक्षक वृंद आणि माझ्या
बालमित्रांनो ,
आज १ ऑगस्ट म्हणजे
लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी
.
भारत
देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. पुण्यात आणि मुंबईत प्लेग
ची साथ पसरली होती.
तिच्या वर उपाय योजनेच्या
नावाखाली इंग्रजांनी
लोकांवर
खूप अत्याचार केले. औषध फवारणी च्या
निमित्ताने लोकांना घराबाहेर
काढले. नासधूस केली. स्त्रियांवर अत्याचार केले. अश्या या जुलमी राजवटी
विरोधात " ह्या सरकारचे डोके
ठिकाणावर आहे का ?" असा
जळजळीत अग्रलेख लिहिणारे थोर नेते होते
" लोकमान्य टिळक"
त्यांचे
पूर्ण नाव होते " बाळ
गंगाधर टिळक". त्यांच्या जन्म २३ जुलै
१८५६ रोजी रत्नागिरीतील चिखली
ह्या गावी झाला. त्यांचे
खरे नाव केशव गंगाधर
टिळक होते. पण घरात सर्व
त्यांना लाडाने "बाळ" म्हणत. पुढे त्यांचे "बाळ"
हेच नाव राहिले. त्यांच्या
वडिलांचे नाव गंगाधर टिळक
आणि आईचे नाव पार्वती
बाई टिळक असे होते. लहानपणा
पासून टिळक खूप हुशार
होते. गणित हा त्यांचा
आवडीचा विषय होता. लहानपणा
पासून ते स्पष्टवक्ते होते.
एकदा वर्गात काही मुलांनी शेंगा
खाल्ल्या आणि त्याची टरफले
तिथेच टाकून ठेवली. गुरुजींना वाटले ती टरफले टिळकांनी
टाकली. त्यांनी त्यांना सर्व टरफले उचलायची
शिक्षा दिली. पण टिळक कुठले
ऐकतात , त्यांनी गुरुजींना निक्षून सांगितले , " मी शेंगा खाल्ल्या
नाहीत , मी टरफले उचलणार
नाही" असे हे टिळक
नेहमी खरं बोलायचे.
पुढे
टिळकांनी खूप शिक्षण घेतले.
त्यांनी वकिली ची परीक्षा पास
केली. लहानपणापासून
त्यांना व्यायामाची आणि खेळाची खूप
आवड होती. आपल्या मित्रांसोबत ते कुस्ती सारखे
खेळ खेळायचे. त्यामुळे त्यांची तब्बेत ठणठणीत झाली होती. पुढे त्यांनी आपल्या
मित्रांसोबत १९८० मध्ये "डेक्कन
एज्युकेशन सोसायटी" ची स्थापना केली.
भारतीय मुलांना चांगले शिक्षण मिळावे हा त्यांचा हेतू
होता.
इंग्रजांच्या
अन्यायाविरोधात भारताच्या स्वातंत्र लढ्यात त्यांनी उडी घेतली. होमरूल
चळवळीची सुरुवात टिळकांनीच केली. त्यांनी
"केसरी" आणि "मराठा" हि वर्तमानपत्रे चालू
केली. त्यातून त्यांनी इंग्रंजांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळेच लोकमान्य टिळकांना " भारतीय असंतोषाचे जनक" म्हटले जाते. टिळकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले कि " स्वराज्य हा
माझा
जन्मसिद्ध
हक्क
आहे
आणि
तो
मी
मिळवणारच". टिळकांच्या
वाढत्या प्रभावामुळे इंग्रजांनी त्यांना अनेकवेळा तुरुंगात टाकले पण आपल्या भारत
भूमीसाठी त्यांनी ती शिक्षा हसत
हसत भोगली. मंडाले च्या तुरुंगात असताना
त्यांनी "गीता रहस्य" हा
महान ग्रंथ लिहिला.
आज आपण खूप उत्साहाने
सार्वजनिक गणेश उत्सव आणि
शिवजयंती साजरी करतो. त्याची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. सार्वजनिक उत्सवामुळे लोक एकत्र येतात.
त्यांच्यात आपुलकी निर्माण होते. म्हणून त्यांनी हे उत्सव सुरु
केले. त्या काळात ह्या
सार्वजनिक उत्सवामुळे त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्य लढ्याची भावना जागृत केली. त्यांच्या ह्या कामामुळे लोकांनी
त्यांना "लोकमान्य" म्हणजे लोकांना मान्य असलेले अशी पदवी त्यांना
बहाल केली.
टिळकांकडून
आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शिकण्यासारखे
खूप आहे. आपण
पण त्यांच्या प्रमाणे खूप शिकले पाहिजे.
आपल्या भारत देशावर नेहमी
प्रेम केले पाहिजे. नेहमी
खरे बोलले पाहिजे. मोबाईल पेक्षा आपण मैदानात आणि
खेळात वेळ घालवला पाहिजे.
सर्वानी आदराने आणि प्रेमाने राहिले
पाहिजे.
अश्या
ह्या महान नेत्याला माझे
शतश नमन . !
जय हिंद जय महाराष्ट्र
!
0 टिप्पण्या