Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

नेताजी सुभाष चंद्र बोस - लहान मुलांसाठी मराठी भाषण | Netaji Subhash Chandra Bose - Speech for Children

 



" नेताजी सुभाष चंद्र बोस "

भारताचा स्वातंत्रलढा जगाच्या इतिहासात अतीशय  दैदिप्यमान  असा स्वातंत्र्यलढा आहे . कित्येक स्वातंत्र्यवीरांनी आपापल्या मार्गाने हा लढा लढला. गांधीजींनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला , टिळकांनी जहाल विचाराचा मार्ग दाखवला , भगतसिंह यांनी इन्कलाब जिंदाबाद चा नारा दिला. पण एक महानायक असा होता ज्याने इंग्रजांच्या जुलुमाला सैनिकी पद्धतीने लढा द्यायचे ठरवले , भारताची स्वतंत्र सशस्त्र सेने उभी केली , ज्या इंग्रजांच्या साम्राज्यावर कधी सूर्य मावळत नव्हता त्या इंग्रजांना घाम फोडला तो महानायक म्हणजे " नेताजी सुभाष चंद्र बोस" . 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्म कटक येथे २३ जानेवारी १८९७ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ हे तेव्हाचे अतिशय नामवंत आणि सत्यवादी वकील होते. स्वभावाने अतिशय उदार होते. घराचे वातावरण चांगले श्रीमंत होते. श्रीमंत घराण्यात जन्म घेतलेले आजकालचे तरुण हे हमखास गर्विष्ठ , उद्दाम आणि निष्काळजी असतात. पण सुभाष चंद्र बोस अजिबात असे नव्हते 


"तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा " ह्या नेताजींच्या आवाहनाने तत्कालीन तरुण क्रांतीकारकांना अक्षरशः  वेड लावले होते . हजारोंच्या संख्येने लोक "आझाद हिंद सेनेत सामील झाले. इतके  प्रखर देशप्रेम सुभाषचंद्र बोस यांच्या ठायी ठायी भरले होते.    

नेताजीचे शिक्षण इंग्रजी शाळेत झाले. तिथे फक्त इंग्रजी शिकवली जात असे. सुभाषचंद्र इंग्रजी खूप अस्सखलित बोलत व लिहत असत. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी भारतीय शाळेत प्रवेश घेतला. त्यांची मातृभाषा बंगाली होती. एकफा शिक्षकांनी त्यांनी "गाय" ह्या विषयावर बंगालीत निबंध लिहायला सांगितला. सुभाष बांबूची अडचण झाली. त्यांनी तुटक्या फुटक्या बंगालीत निबंध लिहिला. त्यांचा निबंध वाचून शिक्षक खूप हसू लागले आणि म्हणाले " निबंध कसा लिहू नये यांचे उत्तम उदाहरणं म्हणजे तुझा निबंध " शिक्षकांनी त्यांना शून्य गुण दिले. सुभाष बाबू खूप नाराज झाले. आपल्याला आपली मातृभाषा येऊनये ह्या पेक्षा दुर्दैवी पणा तो काय आडे त्यांना वाटू लागले. त्यांनी मनाशी पक्का निर्धार केला आणि वर्षभर बंगाली भाषेवर अभ्यास करून प्रभुत्व मिळवले. वार्षिक परीक्षेत त्यांनी बंगाली भाषेत निबंध लिहिला तेव्हा त्यांचे गुरुजी त्यांना म्हणाले " निबंध कसा लिहावा याच उत्तम उदाहरण म्हणजे तुझा निबंध ' इतकी दुर्दम्य इच्छाशक्ती सुभाष चंद्र बोस यांच्या अंगी होती. 


लहानपणी ते अबोल होते. पण उदरपणा त्यांच्या अंगी ठासून भरला होता. त्यांच्या अंगी हे गुण त्यांच्या वडिलांमुळेच आले होते. जरी अबोल आणि उदार असले तरी अत्यंत स्वाभिमानी होते. सुभाष चंद्र कॉलेजला असताना त्यांना ओटेन नावाचा इंग्रजी प्राध्यापक होता. तो खूप गर्विष्ट होता. हिंदी विद्यार्थ्यांना तो तुच्छतेने वागवायचा. वाईट साईट बोलायचा. एक दिवस तो प्रोफेसर म्हणाला कि भारतीय विद्यार्थी भित्रे आहेत. वाघीनीच्या पोटी वाघ जन्म घेतो पण शेळीच्या पोटी शेळी जन्म घेते. भारतातातली माणसे शेळी आहेत. नेताजी त्याचं वर्गात होते. भारत मातेची अवहेलना त्यांना सहन नाही झाली. त्यांनी सरळ पूढे जाऊन त्या प्रोफेसरच्या कानाखाली लगावली. त्या कारणाने त्यांना कॉलेज मधून काढून टाकण्यात आले. भारत मातेबद्दल एकही अपशब्द त्यांनी ऐकून नाही घेतला. 


दोन वर्षांनी नेताजीना कॉलेजला प्रवेश मिळाला. त्यांनी बी ए पूर्ण केले आणि वडिलांच्या इच्छेखातर इंडियन सिविल सर्व्हिसेस च्या परीक्षेच्या तयारी साठी इंग्लंड ला गेले. पण देशप्रेम त्यांना शांत बसून देत नव्हते. इंग्रजांची नोकरीं करणे त्याना पटत नव्हते. त्यामुळे ते परीक्षा न देताच भारतात परत आले.भारतात येण्यापूर्वी ते चित्तराजन दास यांच्याशी संपर्कात होते. भारतात आल्यावर ते महात्मा गांधींच्या प्रेरणेने काँग्रेस मध्ये सामील झाले. स्वातंत्र्य लढ्याचे कोलकत्यातील नेतृत्व त्यांनी केले. 1938 मध्ये ते काँग्रेस चे अध्यक्ष सुद्धा झाले. सुभाष बाबुंची रणनीती जशास तशी होती. इंग्रजाना अडचणीत आणण्याची एक ही संधी ते सोडत नसत पण गांधीजींना त्यांची ही कार्यशैली आवडत नव्हती. म्हणून नेताजीनी काँग्रेस सोडली. 


नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धच्या वेळी स्वातंत्र्य लढा अजून तीव्र केला. इंग्रज सरकारने त्यांना नजर कैदेत ठेवले पण जानेवारी 1941 मध्ये नेताजीनी त्या नजर कैदे तुन शिताफिने सुटका करून घेतली. छत्रपती शिवाजी महाराज  आग्राहून निसटले अगदी तसेच. वेगवेगळ्या देशात फिरत नेताजींनी इंग्रजा विरुद्ध मदत जमा केली. जर्मनीत त्यांनी आझाद हिंद रेडिओ आणि भारतीय स्वातंत्र्य संघटना याची स्थापना केली. जर्मनीकडून फारशी मदत मिळत नाही हे पाहुन ते खूप मोठा सागरी प्रवास करून जपान ला पोहचले. पानबुडी आणि खवळलेल्या समुद्रात रबरी बोटीने प्रवास केला.


जपान मध्ये सुभाष चंद्र बोस यांनी ऑक्टोबर २१, १९४३ रोजी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. नेताजी आझाद हिंद सेनेचे सरसेनापती झाले. आझाद हिंद सेनेत त्यांनी महिलांची खास बटालियन उभी केली तिला नाव दिले " झांशी ची राणी रेजिमेंट". दुसऱ्या महायुद्ध दरम्यान जपानच्या मदतीने आझाद हिंद सेने ने अंदमान आणि निकोबार हि बेटे इंग्रजांकडून जिंकून घेतली.  नेताजींनी ह्या बेटांचे "शहीद" आणि "स्वराज" बेटे असे नामकरण केले. नंतर त्यांनी इंफाळ आणि कोहिमा वर सुद्धा आक्रमण केले. 


नेताजींच्या ह्या पवित्र्याने इंग्रज सरकार हतबल झाले. स्वातंत्र लढा अजून बळकट झाला. दुसऱ्या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते.


ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.


अश्या ह्या महान सेनापतीला , भारत मातेच्या खऱ्या सुपुत्राला वंदन करताना एवढेच म्हणावेशे वाटते 


हमें सब सुखों को भूल जाना पड़ेगा, 

वतन के लिये दुख उठाना पड़ेगा | 

अय आझाद-हिंदी ! उठो कमर बाँधो ! 

वतन लुट रहा है, बचाना पडेगा, 

हुक्म नेताजी का बजाना पड़ेगा


अजून वाचा : सरदार वल्लभभाई पटेल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या