Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षक दिन - लहान मुलांसाठी मराठी भाषण / निबंध | Teachers day Speech / essay for Kids


शिक्षक दिन

 Best speech on Teachers Day in Marathi for school students

तुम्ही कधी मूर्तिकार पहिला आहे का ? मातीची मूर्ती , दगडाची मूर्ती बनवण्यापूर्वी त्याच्याकडे काय असत ?

फक्त माती नाहीतर दगड . पण त्या मातीवर, त्या दगडावर अगदी मनापासून मेहनत घेऊन तिला तो घडवतो. एक एक अंग काळजीने आकारास आणतो.

शिक्षकांची भुमिका  म्हणजे तरी दुसरं काय आहे ? मानवरूपी मातीचा गोळा , त्यावर मेहनत घेऊन त्याला एक आदर्श, सुजाण नागरिक बनवण्याचं महत्वाचं काम शिक्षक करतात. त्याच्यातले गुण  अवगुण ओळखून त्यावर शिक्षणाच्या हातानी आकार देऊन त्याला खऱ्या आयुष्यात सफल बनवणे हे शिक्षणाचे कार्य म्हणजे सृजन शिलता. उद्याच्या जबाबदार नागरिक घडण्याचे  महान काम शिक्षकांनाच करावे लागते. म्हणून म्हणतात कि गुरुविण जीवन व्यर्थ सारे !

 

भारतमध्ये दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा भारतात "शिक्षक दिन" म्हणून साजरा केला जातो. भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती हि दोन्ही पदे डॉ. राधाकृष्णन यांनी भूषवली. पण तरीही लोक त्यांना जास्त आदर्श शिक्षक म्हणूनच ओळखत आले. भारतीय समाजात शिक्षकांचे स्थान आणि महत्व किती मोठं आहे हे येणाऱ्या पिढीच्या लक्षात राहावे म्हणून "शिक्षक दिन"  साजरा करण्यात येऊ लागला.  

 

आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून गुरूंना खूप महत्व आहे. प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, पांडव, वगैरे सर्व जण तेव्हा आपल्या गुरूंच्या आश्रमात जाऊन शास्त्र , युद्धकला , राजनीती ह्या सर्वांचे शिक्षण घायचे. आपल्या शिक्षकांच्या शब्दाबाहेर ते कधीही वागले नाहीत. म्हणून पुढे जाऊन जे श्रेष्ठ बनले. अगदी शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत  सुद्धा गुरूंचा मोलाचा वाटा आहे. अगदी अलीकडच्या काळात सुद्धा सचिन तेंडुलकर याच्या यशात त्याचे शिक्षक रमाकांत आचरेकर यांनी मोलाची भूमिका पार पाडली. 

 

आपले पहिले शिक्षक म्हणजे आपले आई वडील. आपल्याला चालायला , बोलायला शिकवतात ते आपले आई वडील.  त्यानंतर आपल्या आयुष्यात येतात शिक्षक. आपल्याला अक्षरे शिकवता शिकवता ते आपल्यातला माणूस घडवत असतात. नुसते कसे बोलावे हे ते शिकवत नाहीत तर चांगले कसे बोलावे हे ते शिकवतात. आपल्याला नुसतं गणित शिकवत नाहीत तर आयुष्यातल्या सुख दुख्खाची बेरीज वजाबाकी कशी करायची हे शिकवतात. शिक्षक फक्त चित्रकला शिकवत नाहीत तर आयुष्यात छोट्या छोट्या प्रसंगात रंग कसे भरायचे हे त्यांच्या मुले आपल्याला कळत. शिक्षक फक्त विज्ञान शिकवत नाहीत तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन जीवनात कसा वापरायचा ते शिकवतात. शाळेत फक्त खेळ शिकवत नाहीत तर आयुष्यात येणाऱ्या अडचणींना कास समोर जायचं ते शिकवतात. म्हणून मी म्हटलं कि मातीच्या गोळ्याला योग्य आकार देऊन त्याची चांगली मूर्ती घडवण्याचं खूप कठीण काम आपले शिक्षक करत असतात.  

आपल्या वडिलांकडे फक्त आपणच असतो शिकवण्यासाठी. पण शिक्षकांकडे शाळेत कित्ती सारी मुले असतात. एवढ्या मुलांना शिकवणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे, सगळ्यांना चांगलं वळण लावणे, प्रत्येकाच्या प्रगतीकडे लक्ष देणे अशी कितीतरी जबाबदारी शिक्षकांवर असते. शिक्षकांना सर्व विद्यार्थी सारखेच असतात. ते कधीही आपल्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करत नाहीत.

भारतात बऱ्याचश्या शाळेत शिक्षक दिनादिवशी विद्यार्थी स्वतः शिक्षक बनतात. आणि शिक्षकांप्रमाणे मुलांना शिकवतात. शिक्षकांच्याच्या प्रति आपला आदर , आणि कृतज्ञता व्यक्त करतात. 

आपले शिक्षक आपल्याला ओरडतात , मारतात म्हणून आपण नाराज होतो. पण ते हे सर्व मजेने करतात का ? तर नाही. जसे ते आपल्याला प्रेमाने समजावतात तसेच काही वेळा कठोर होऊन आपल्याला समजावतात. त्या शिवाय काही गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत. आपल्याला मारताना त्यांनाही वाईट वाटत पण पुढे जाऊन आपण कुठे कमी पडू नये, आपल्याला शिस्त लागावी,  म्हणून ते आपल्याला शिक्षा देतात. आपण त्यांचं ऐकल तर कशाला आपल्याला शिक्षा करतील.

 


"शिक्षक हे त्या झाडासारखे असतात, 
जे स्वतः उन्हात उभे राहून शिष्यांना सावली देतात.”

देशाच्या प्रगतीत सुद्धा शिक्षक महत्वाची भूमिका बजावतात. एक आदर्श शिक्षक किती तरी अशी मौल्यवान रत्न घडवत असतो जे आपल्या देशांचे नाव जगात गाजवत असतात. शिक्षणाच्या अथक मेहनतीमुळे चांगले वैज्ञानिक , चांगले डॉक्टर , चांगले खेळाडू घडत असतात. एक सक्षम देश निर्माण होत असतो. ज्या देशाचे शिक्षक चांगले असतात त्या देशाची नेहमी प्रगतीच होत असते.

 

ह्या पुढे आपण सर्व शिक्षकांची आज्ञा पाळूया. 

अश्या ह्या सर्व शिक्षकांना माझे सादर प्रणाम. आणि खूप खूप आभार !

 

जय हिंद जय महाराष्ट्र !


हे Teachers Day Speech in Marathi तुम्हाला आवडलं तर share करा

शिक्षक दिनानिमित्त काही  Quotes / Captions : 

🌸 Teachers Day Quotes in Marathi

  1. “गुरु हा ज्ञानाचा महासागर असतो, जो शिष्याच्या जीवनाला उजळवतो.”

  2. “शिक्षक हे केवळ शिकवणारे नसतात, ते आयुष्य घडवणारे शिल्पकार असतात.”

  3. “विद्या ही खरी संपत्ती आहे, आणि शिक्षक हा तिचा खरा रक्षक आहे.”

  4. “जगात आई-बाबांनंतर सर्वात जास्त मान द्यावा असा जर कोणी असेल, तर ते  म्हणजे शिक्षक.”

  5. “ज्ञानाच्या दिव्याला प्रज्वलित करणारा हात म्हणजे शिक्षकाचा हात.”

  6. “शिक्षक हे त्या झाडासारखे असतात, जे स्वतः उन्हात उभे राहून शिष्यांना सावली देतात.”

  7. “गुरुचे ऋण कधीही फेडता येत नाही, कारण ते आपल्याला स्वतःपेक्षा मोठं होण्याची ताकद देतात .”

  8. “शिक्षण देणे हे एक व्यावसायिक कार्य नाही, ते एक पवित्र ध्येय आहे.”

  9. “जीवनात यशस्वी व्हायचं असेल, तर प्रत्येक शब्द गुरुंचा मंत्र मानावा.”

  10. “शिक्षक म्हणजे प्रेरणा, मार्गदर्शन आणि यशाचा खरा साथीदार.”


📸 Teachers Day Captions for Instagram

 / Facebook in Marathi

  1. 🌸 “गुरुशिवाय जीवन अपूर्ण आहे… धन्यवाद माझ्या सर्व शिक्षकांना 🙏 #TeachersDay”

  2. 📚 “जगण्याची खरी कला शिकवणारे म्हणजे शिक्षक 👩‍🏫👨‍🏫 #HappyTeachersDay”

  3. “तुमच्या शिकवणीशिवाय माझं आयुष्य अपूर्ण राहिलं असतं… #RespectForTeachers”

  4. 🌿 “ज्ञानाच्या वाटेवर चालायला शिकवणारे, प्रत्येक पावलाला आधार देणारे – माझे शिक्षक 💐 #TeachersDay2025”

  5. ❤️ “आई-बाबांनंतर जर कोणी सर्वात जास्त मान द्यावा असा असेल, ते माझे  शिक्षक 🙏 #GuruPranam”

  6. 🌟 “शिक्षक म्हणजे फक्त ज्ञान देणारे नाही, तर जीवन घडवणारे शिल्पकार आहेत 🏆 #ThankYouTeacher”

  7. 📖 “माझ्या प्रत्येक यशामागे माझ्या शिक्षकांची शिकवण आहे… #Grateful #TeachersDay”

  8. 🌺 “ज्ञानाच्या दिव्याला प्रज्वलित करणारे हात म्हणजे शिक्षक 🕯️ #RespectTeachers”

  9. 💡 “शिक्षक म्हणजे एक अशी ज्योत जी स्वतः जळते पण इतरांचे जीवन उजळवते 🔥 #HappyTeachersDay”

  10. 🌸 “Guru हा शब्दच पुरेसा आहे कारण त्यात जीवनाचे सार आहे 🙏 #TeachersDaySpecial”

 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या