Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

न संपणार दुःख - Cricket Worldcup - Endless sorrow

" न संपणार दुःख "


 How to overcome from this? 

 

काहीच कळत नाहीये . कस बाहेर यायचं यातूनकाहीच चांगलं नाही वाटत आहे. ना जेवणाला चव आहे ना कामात लक्ष लागतंय. एक अनामिक दडपण जाणवतंय मनावर. का असं वाटतंय कि  सर्व संपलय. सामना संपून १२ तासाहून जास्त काळ लोटला आहे. तरी कुठंच काही चांगलं वाटत नाहीये. सकाळी ऑफिस ला पोहचल्यावर उठावाने एकमेकाला "गुड मॉर्निंग" करणारे आम्ही आज एक खिन्न स्मितहास्याने फक्त एकमेकांकडे पहिले. अर्धा तास कोणी काहीच बोलले नाही.  ऑफिस ची कामं यांत्रिकपणे  करतोय. कधी कधी वाटत खरंच आपण यंत्र असायला हवं होत. म्हणजे हे मन तरी नसत आणि मनात उठणारे हे भावनिक कल्लोळ तरी नसते. मन नसत तर त्या मनावर क्रिकेट ला अधिराज्य गाजवता आलं नसत. आणि आजच्या दिवसासारखा बिनकामी दिवस जगावं लागला नसता. मनाला चेहरा असता तर आज सर्व भारतीयांचे चेहरे निस्तेज दिसले असते.

 

नुसताच भकासपण भरून राहिलाय वातावरणात. रोहित चे पाणावलेले डोळे आठवून आठवून डोळ्यात पाणी येतंय. विराटचा कॅप ने झाकलेला चेहरा राहून राहून लॅपटॉप  च्या स्क्रीन वर दिसतोय. शामी - बुमराह च्या पडलेल्या खांद्यांवरचे ओझे माझ्या मानेला त्रास देताहेत. हेड च्या प्रत्येक धावगणिक अहमदाबाद च्या मैदानात वाढत जाणारी शांतता अजून मनातून जात नाही आहे

 

गेला महिनाभर जी धुंदी होती मनावर ती खाडकन उतरली पण अजून वास्तवात यायला मन तयार नाही. गेल्या दहा सामन्याचा आनंद एका दिवसात लोपला. पाकिस्तान ला चारलेली धूळ आठवून पण मन उल्हसित नाही होत आहे. न्यूजीलँड चा  इतक्या वर्षाचा वचपा काढला तरीही समाधान नाही वाटत आहे. कारण तो एक क्षण जो ह्या सर्वावर भारी होता त्याला आपण मुकलो. खेळात हार जीत आलीच पण अंतिम सामन्यातली हार नाही पचवायला जमत सहजासहजी. त्यात क्रिकेट म्हणजे आपल्याकडे जीवनावश्यक गोष्ट झाली आहे. आणि त्यात जगजेत्ते व्हायचा हातातोंडाशी आलेला घास कांगारूंनी हिसकावला. इकडे आसपास कोण ऑसीज पण नाही ज्याला लोकल मध्ये दोन वाजवून मन शांत केले असते.

 

कितीही ठरवलं कि आता क्रिकेट चा नाद कमी करायचा तरी ते जमणार नाही हे पण माहितेय, दुसऱ्या कोणत्या खेळात मन रमत नाही. हे साला मनच सगळ्या ला कारणीभूत आहे. आपले मन आपल्या आनंदाची व्याख्या ठरवत असत. आणि जे सदैव भारतीय संघाच्या विजयाशी जोडलेले असते. आपण सर्व फॅन्स ची हि अवस्था आहे तर प्रत्यक्ष तिथे खेळणारे खेळाडू , प्रशिक्षक याच्या मनाची काय अवस्था असेल. खेळ हा नेहमी बिनभरवशाचा असतो. क्रूर असतो.  वेळ निघून गेली कि जर तर ला काहीच अर्थ नसतो. जर रोहित तो शॉट खेळाला नसता , जर श्रेयस आऊट झाला नसता , जर कोहली च्या बॅटला लागून बॉल स्टंप वर गेला नसता, जर हार्दिक संघात असता , अमुक आणि तमुक ... ह्या सर्व जर तर च्या गोष्टी आहेतआता वेळ निघून गेली आहे. आता चार वर्ष परत प्रतीक्षेत घालवायची आहेत.

आपल्याला आपल्या भारतीय संघाचा अभिमान नक्कीच वाटला पाहिजे. सदैव मनात हा संघ ठासून भरलेला असेल. 

दैव एवढं पण निष्ठुर नसावं . मालिकावीर , उत्कृष्ट गोलंदाज , कित्येक विश्वविक्रम नोंदवलेल्या संघाला त्या चकाकणाऱ्या ट्रॉफी पासून वंचित राहावं लागतंय. नियतीचा क्रूरपणा आहे हाएवढा चांगला संघ खचितच पुन्हा मिळेल. पुढच्या विश्वचषकाला गवसणी घालतील सुद्धा

माहित नाही पुढे काय होईल पण आजचा दिवस पुढे जात नाही आहेपण आज हे मन जे थाऱ्यावर येत नाही आहे त्याच काय करायचं ? जिव्हारी लागलेल्या पराभवाच्या झळांना फुंकर कशी घालायची हे कोणी सांगेल का


लोकलनामा - भाग ३ एक अस्वस्थ वास्तव

आपल्याला लेख आवडत असल्यास प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांसोबत शेअर करा 

-अव्यक्त अभिजीत   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या