बाप्पाची मूर्ती आणा घरा
गाण्याची शब्द रचना - सिद्धेश राजाराम घाग
गाण्याची चाल - (दत्ताची मूर्ती आणा दादा)
बाप्पाची मूर्ती आणा घरा
येणाऱ्या गणेश चतुर्थीला
राहील वर्ष भरी तुमच्या शिदोरीला
सारे घर नटले
स्वागताला हे आतुर झाले
शोभविले घर माझे II २ II
राहील वर्षभरी तुझे रूप देवा II धृ II
दुःख माझे निवले
आनंदुण हे घर माझे गेले
रूप तुझे गोजिरे II २ II
राहील वर्षभरी तुझे रूप देवा II धृ II
आला देव माझा
साऱ्या जगाची विघ्न हराया
तूच सुखं करता तूच दुःख हरता
राहील वर्षभरी तुझे रूप देवा II धृ II
येताना आलास आनंद घेऊन बाप्पा
जाताना जाशील दुःख देऊन देवा
राहील वर्षभरी तुझे रूप बाप्पा II धृ II
📸- Siddhesh Rajaram Ghag😗
Edit- Raj Sachin Adhatrao😉
1 टिप्पण्या
छान 👌🏼👌🏼👌🏼... आणि धन्यवाद दादा 🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवा