नवीन गणेश आरती - कोकणातल्या गणपतीच्या आरत्या
गणेशोत्सव म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजे गणेशोत्सव हे एक अजरामर समीकरण आहे. गणपती आपल्या घरी येतो ह्या साठी कोकणी माणूस काय काय करेल ह्याचा नेम नाही. आणि अश्या या "बाप्पा" च्या आरतीसाठी कोकणात नव्या नव्या आरत्या नाही घेतल्या तर तो कोकणी माणूस कसला . तर अश्याच काही आरत्या आम्ही घेऊन आलो आहोत खास आमच्या वाचकांसाठी.
।। देवा गजानना आरती हि तुला ।।
देवा गजानना आरती हि तुजला
देवा गजानना आरती हि तुजला
गातो तव लीला
गातो तव लीला
देवा गजानना आरती हि तुजला
देवा गजानना आरती हि तुजला ।। धृ ।।
जास्वंदीची आवड तुला
जास्वंदीची आवड तुला
दुर्वा जुडी हि वाहू तुजला
दुर्वा जुडी हि वाहू तुजला
आळवितो तुला ,
आळवितो तुला,
देवा गजानना आरती हि तुजला ।। १ ।।
पृथ्वी प्रदक्षिणा कार्तिकेयाला
पृथ्वी प्रदक्षिणा कार्तिकेयाला
मातापित्या भोवती तू फिरला
मातापित्या भोवती तू फिरला
मान पहिला तुला,
मान पहिला तुला
देवा गजानना आरती हि तुजला ।। २ ।।
येशी घरी भाद्रपदाला
येशी घरी भाद्रपदाला
चतुर्थी सुखाचा सोहळा
चतुर्थी सुखाचा सोहळा
भक्त आनंदला
भक्त आनंदला
देवा गजानना आरती हि तुजला ।। ३ ।।
"गणराया आरती हि तुजला"
आरती हि , आरती हि, आरती हि तुजला sss
गणराया आरती हि तुजला , गणराया आरती हि तुजला ।। धृ ।।
रुणझुण पायी वाजती घुंगरू ।
रुणझुण पायी वाजती घुंगरू ।
गगनी ध्वनी भरला देवा
गगनी ध्वनी भरला देवा २
आरती हि तुजला , गणराया आरती हि तुजला ।। १ ।।
भाद्रपद मासी शुद्ध चतुर्थीशी,
भाद्रपद मासी शुद्ध चतुर्थीशी,
पूजिती जन तुजला देवा २
आरती हि तुजला , गणराया आरती हि तुजला ।। २ ।।
गंध पुष्प धूप दीप समर्पूनि
गंध पुष्प धूप दीप समर्पूनि
अर्पिती सुमनाला देवा २
आरती हि तुजला , गणराया आरती हि तुजला ।। ३ ।।
भक्त हरी हा आठवतो रूप
भक्त हरी हा आठवतो रूप
गातो तव लीला देवा २
आरती हि तुजला , गणराया आरती हि तुजला ।। ४ ।।
|| दीनदयाळा गणपती स्वामी द्यावी मज भेटी ||
दीनदयाळा गणपती स्वामी द्यावी मज भेटी
दीनदयाळा गणपती स्वामी द्यावी मज भेटी
तव चरणांची सख्या मजला आवड मोठी
मजला आवड मोठी
दीनदयाळा गणपती स्वामी द्यावी मज भेटी ।। धृ ।।
कवण अपराध म्हणुनी केला रुसवा ( २)
अहर्निशी मी हृदयी तुझा करीतसे धावा
तुझा करीतसे धावा
दीनदयाळा गणपती स्वामी द्यावी मज भेटी ।। १ ।।
चिंताकुपी पडता कोण काढील बाहेरी ( २)
धावे पावे सख्या करुणा करुनि उध्दरशी
करुणा करुनि उध्दरशी
दीनदयाळा गणपती स्वामी द्यावी मज भेटी ।। २ ।।
ऐसे होते चित्ती तरी का प्रथमची देवा (२)
अंगीकार करुनि , केला कृपेचा ठेवा
केला कृपेचा ठेवा
दीनदयाळा गणपती स्वामी द्यावी मज भेटी ।। ३ ।।
आता करणे त्याग तरीही स्वामी अघटित (२)
शरण आलो माझा , आता चुकवी अनर्थ
आता चुकवी अनर्थ
दीनदयाळा गणपती स्वामी द्यावी मज भेटी ।। ४ ।।
दास तुझा हा विनवी दोन्ही जोडुनिया कर (२)
तव चरणाचा सख्या, मजला आहे आधार
मजला आहे आधार
दीनदयाळा गणपती स्वामी द्यावी मज भेटी ।। ५ ।।
|| आरती करू मोरया . . . रे मोरया ||
आरती करू मोरया . . . रे मोरया
आरती करू मोरया . . . रे मोरया ।। धृ ।।
रुणझुण पायी वाजती पैंजण
रुणझुण पायी वाजती पैंजण
गणरायाचे झाले आगमन
गणरायाचे झाले आगमन
वंदुया गणरायाला . . . रे मोरया
आरती करू मोरया . . . रे मोरया ।। १ ।।
तू सकळांचा भाग्यविधाता
तू सकळांचा भाग्यविधाता
तिन्ही विद्येचा स्वामिदाता
तिन्ही विद्येचा स्वामिदाता
गणपतीबाप्पा मोरया रे मोरया . .
आरती करू मोरया . . . रे मोरया ।। २ ।।
टीप : वरील आरती ह्या आम्ही लिहिलेल्या नाहीत. मौखिक आणि लिखित स्वरूपात वेगवेगळ्या स्त्रोत्रंकडून ही माहिती मिळाली आहे.
|| गणपती बाप्पा मोरया ||
0 टिप्पण्या