Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

जन्माची गाठ बांधताना | Janmachi Gaath Bandhtana

जन्माची गाठ बांधताना


जन्माची गाठ बांधताना 

जन्माची गाठ आपली बांधताना
नवं-आयुष्याची घडी रचताना,
हात हातात तुझा घेऊनि
श्वास श्वासात गुंतताना ||

स्पर्श नवे ध्यास नवे
आयुष्य अबोल असताना,
असेन सदैव सोबत तुझ्या
सावली तुझी खुलेल हसताना ||

आयुष्याच्या नौकेचा काठकिनारा
होईल प्रत्येक अडचणींचा पाठपुरावा,
स्वप्ने सारी खुलतील, इशारे तुझे पाहताना
वचनबद्ध राहील मी, कळी प्रेमाची खुलताना ||

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या