Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

जय हनुमान आणि AI | Hanuman and AI

 


"जय हनुमान आणि AI "

आज सहज AI  चा उपयोग करून इमेज बनावायचा  प्रयत्न करत होतो . आज शनिवार आहे. महाबली हनुमान यांचा वार ! 

म्हटलं बजरंग बली जर मेट्रो शहरात अवतरले तर ... .  मग तसे वर्णन टाकून इमेज जनरेट करायचा प्रयत्न केला.



 


AI  ने काही भन्नाट फोटो तयार करून दिले. पण AI ला भारतीय पुराणाची माहिती थोडी कमी दिसली. सुरुवातीच्या सर्व चित्रात हनुमान यांचे शस्त्र त्रिशूल येऊ लागलं. मग थोडं गूगल केल्यावर मला कळलं कि गदेला विंग्रजीत "MACE " म्हणतात. मग डिस्क्रिपशन मध्ये बदल करून "MACE " टाकलं. त्यानंतर हे चित्र आलं. 


यात  पण गदा जरा छोटीच दिसतेय. मारुतीरायाची खऱ्या गदेचा एक हलका तडाखा जरा या AI  वाल्याना द्यायला पाहिजे म्हणजे यांची सिस्टिम जरा ताळ्यावर येईल. 


म्हटलं हे AI  वाले जरा स्वतःला जास्तच शहाणे समजतात. ह्यांना वाटत ह्यांचे अव्हेंजर म्हणजे मोठे शाने . . म्हटलं थांबा आता दाखवतो तुम्हाला आमच्या मारुती रायाचा तडाखा. 


मग टाकलं हनुमान वर्सेस अव्हेंजर . झालं AI वाल्यांची बोबडी वळली. मला त्यांनी उलट मेसेज केला 


"I'd love to create that dynamic image for you! It sounds like an epic clash of mythology and superheroes. However, it seems there's a little technical issue right now preventing me from generating the image" 


मी म्हटलं " नाही, आम्हाला त्वरित हे छायाचित्र निर्माण करून हवे आहे. अन्यथा मारुती राय शेपटी पेटवून जर AI च्या आवारात घुसले तर काय होईल हे विचारायला तुम्हाला लंकेत जावं लागेल" अर्थात हे सर्व मी मनातच म्हणालो. 


मी काही हटलो नाही .. परत टाकलं हनुमान वर्सेस अव्हेंजर . . . 


मग काय  " त्राही भगवान " म्हणत AI  ने चित्र जनरेट करून दिले. 



सर्वशक्तिमान बजरंगबली चे रौद्र रूप आणि समोर दुनियाभरच्या अव्हेंजरची पळता भुई थोडी झालेली. आयर्न मॅन ला कुठे पळू नि कुठे नको असं झालेलं. तो महाकाय हल्क पण चिंटुकलं करून टाकला AI  ने. मग आमचा मारुती राया आहेच सर्वशक्तिमान ! 


माझं मन तृप्त झालं. AI  ला अद्दल घडवल्यासारखं वाटलं. मग म्हटलं असू दे ते अव्हेंजर्स पण दुनियेला वाचवायचाच काम करतात. म्हटलं त्यांना मारुतीराया सोबत एक फोटो काढून देऊया. मग सर्व लाईनीत उभे राहिले आपल्या बजरंगबली समोर फोटो काढायला. 

पण ह्या "AI  च्या आईचा घो". परत मारुतीरायाच्या हातात त्रिशूल दिला यांनी . असो पुढच्यावेळी बघतो याना. 

बजरंगबली कि जय .  

टीप : सर्व छायाचित्र AI च्या साहाय्याने तयार केली आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या