"स्वतः वरच्या प्रेमाच्या शोधात"
"The art of Self Love"
काल
नेटफ्लिक्स वर "द कपिल शर्मा
शो" पाहिला. पाहुणी होती वन अँड
ओन्ली एव्हरग्रीन "रेखा " . "रेखा " बस नाम हि
काफी है . तिचे डोळे,
तीचं सौंदर्य , तिचे बोलणं , तिचं वागणं
, तिच्या अदा, त्यातला ठहराव . . . उफ्फ...
मन घायाळ करायला लावणार सगळं सगळं आहे
तिच्याकडे. माझ्या लहानपणी ती जशी दिसायची
तशीच ती आता पण
दिसते. मी दोन वर्षांपूर्वी
जसा दिसायचो तसा पण आता
दिसत नाही. असो , पण हा ब्लॉग
रेखा बद्दल नाही आहे. आपल्या
बद्दल आहे. "स्वतः" बद्दल आहे.
तर त्या एपिसोड मध्य
रेखा ला कपिल ने
विचारलं कि " प्रेमाबद्दल तुमचं मत काय ?"
रेखाने
उत्तर दिले " योग्य साथीदार मिळाला तर एकदाच प्रेम
होऊ शकत. ( हा टोमणा कोणासाठी
होता ते तुम्हाला कळलं
असेलच ) . बाकी प्रेम म्हणाल
तर मी सर्वांवर प्रेम
करते , माझ्या कलेवर , माझ्या चाहत्यांवर , माझ्या मित्रांवर , निसर्गावर , सर्वांवर प्रेम करते , पण मी सर्वात
जास्त प्रेम करते "माझ्या स्वतः वर" , self love "
रेखाच्या
त्या उत्तराने मला विचार करायला
भाग पाडलं. आपण करतो का
स्वतः वर
प्रेम , स्वतःच्या मनाला विचारा कि
संसाराचा रहाटगाडा ओढत असताना , कंपनीच्या
डेडलाईन सांभाळत असताना , घरच्यांचे हट्ट पुरवत असताना
, स्वतःसाठी थोडा वेळ दिला
का आपण ?
काही
वर्षांपूर्वी " जब वि मेट"
सिनेमात करिना सुद्धा असंच बोललेली " मै
मेरे खुद कि फेवरीट
हू " . आपण आहोत का
आपल्या स्वतःचे फेवरीट ? स्त्री असो कि पुरुष
, मुलगा असो कि मुलगी,
आई असो कि बाबा
, तुम्ही कधी स्वतः वर
प्रेम करून पाहिलं का
?
कधी जगाला काय वाटेल हा विचार सोडून स्वतःला काय आवडतंय हा विचार करून पाहिला का ? मुळात स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे काय ? अहंकारी बनायचं ? स्वार्थी बनायचं ? नाही ओ . स्वप्रेम म्हणजे अहंकार नाही , स्वार्थीपणा नाही . स्वतःशी स्वतःच एक चांगलं नातं बनवणे म्हणजे स्वप्रेम. स्वप्रेम म्हणजे स्वतः स्वतःची किंमत ओळखणे . आपल्यातल्या उणीवा ओळखून त्या सुधारण्यासाठी स्वतः ला संधी देणे म्हणजे सेल्फ लव्ह . तुमचं मन, तन आणि आत्म्याला प्राधान्य देणे म्हणजे आत्मप्रीती.
तर हे स्वतःवर
प्रेम
, आत्मप्रेम
महत्वाचं
का
आहे
?
मानसिक आरोग्य
: सर्वात महत्वाचं आहे तुमचं मानसिक
स्वास्थ . जगाने तुम्हाला कितीही नाकारू द्या , झिडकारू द्या , जर तुम्ही स्वतःवर
प्रेम करत असाल तर
तुम्हाला कसला फरक नाही
पडणार. तुमचं स्वतःवरच प्रेम तुम्हाला जीवनात कधीही ढासळू देत नाही. कितीही
कठीण परिस्थितीत तुम्ही तावून सुलाखून परत उभे राहता.
नात्यांची मजबुती : जेव्हा
तुम्ही स्वतःशी चांगला संवाद साधू शकता तेव्हा
तुम्ही जगाशी चांगला संवाद साधू शकता. संवाद
कौशल्य सुधारू शकता , मर्यादा
ओळखू शकता. ज्यामुळे जगात वावरताना अधिक
घट्ट नाती जोडू शकता.
आत्मविश्वास : आत्मप्रेमामुळे सर्वात जास्त वाढतो तो आत्मविश्वास . आणि
आत्मविश्वास हि सर्व यशाची
गुरुकिल्ली आहे. आपलं ध्येय
साध्य करण्यासाठी झटणे, चॅलेंजेस स्वीकारणे , आपल्या कंफर्ट झोन च्या बाहेर
जाऊन काम करणे हे
सर्व आत्मविश्वासाने शक्य असते.
शारीरिक स्वास्थ : जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करू लागत तेव्हा आपोआपच आपल्या शरीराची काळजी घेऊ लागता. आपल्या खाण्याकडे लक्ष देऊ लागता आणि मग साहजिकच "शरीर संपदा" कशी टिकून राहील याकडे लक्ष देता. विशेषतः मध्यमवर्गीय स्त्रिया ह्या बाबतीत मागे राहतात. बाळंतपणा नंतर त्यांचं सर्व लक्ष असतं आपल्या बाळाकडे. आणि त्याच दरम्यान त्यांचं शरीराकडे दुर्लक्ष होतं. वाढत्या वजनाने न्यूनगंड वाढत जातो. आणि स्वतःच स्वतःला उपेक्षित करू लागतात. जेव्हा त्यांना आत्मप्रेमाची सवय लागेल तेव्हा त्या स्वतः कडे लक्ष देतील.
स्वतःवर प्रेम
कसे
कराल
:
१. स्वतः समजून घ्या स्वतःला . लोकांशी प्रेमाने वागता तर स्वतःशी पण प्रेमाने वागा. विशेषतः अडचणीच्या काळात स्वतःला साथ द्या . आपल्या चुकांसाठी स्वतःला माफ करायला शिका. स्वतः ला माफ न करू शकणारी माणसे आयुष्यात सदैव मनात कुढत राहतात.
२. तुमच्या शरीराची काळजी घ्या. शरीराला उपयुक्त असे पोषण द्या.
तुमच्या मनाचे हट्ट पुरवा. त्याला
गाणी ऐकायचीत तर गाणी ऐका,
पुस्तक वाचायचं तर पुस्तक वाचा
, मनाला क्रिकेट खेळायचं तर खेळा. त्याला
पुष्पा -२ पाहायचाय तर
पहा. कशाला मन मारता , मन
न मारणे हीच स्वप्रेमाची सुरुवात
आहे. हा पण आत्मप्रेमासाठी
वाईट सवयी लावून घेणे
, वाईट व्यसन लावून घेणे म्हणजे आत्मप्रेम
नाही हे लक्षात ठेवा.
३. नाही म्हणायला शिका.
जिथे जरुरत नाही तेथे जबरदस्ती
आपली ऊर्जा व्यर्थ घालवू नका. ज्या गोष्टी
तुम्हाला आनंद देतात त्यावर
वेळ सत्कारणी लावा.
४. स्वतःशी संवाद साधायला सुरु करा. नकारात्मक
विचार झटकून टाका ते मनाला
मरगळ देतात. तुमचे छोटे छोटे यश
सुद्धा साजरं करा.
५. दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी
काढा. बरं वाटेल कि
कोणीतरी तुम्हाला वेळ दिला.
आत्मप्रेम हा एक प्रवास आहे. जगताना करायचा प्रवास. लक्षात ठेवा तुम्ही पण स्वतःच्या कौतुकास पात्र आहात. जेव्हा तुम्ही स्वतः स्वतःचे आवडते व्हाल तेव्हा जगाला पण आपसूक आवडू लागाल.
अजून वाचा : आनंदाचे विज्ञान
0 टिप्पण्या