विजय गर्जना भारताची | Victory Roar of India
पिच्चरच नाव : विजय गर्जना ( வெற்றி கர்ஜனை )
डिरेक्टर : जी. गौतम
प्रोड्युसर : जयजय शाह
स्टोरी : आय सी सी आय
तर पिच्चर ची कथा अशी आहे
एका गावात वर्षानुवर्षे चालत आलेले एखादे मोठे खानदान असते ज्यांचा पूर्ण गावावर दबदबा असतो . ते प्रस्थ म्हणजे आपला "भारतीय संघ " . आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी जो कधी एके काळी ह्याचाच भाऊ असतो पण स्वार्था साठी आता तो वेगळा होऊन ह्यांना सतत हरवायचा प्रयत्न करत असतो तो म्हणजे खलनायक "भिकारीस्तान".
नायक गँगचा म्होरक्या आहे " सूर्या " south मध्ये Suriya आणि खलनायक गँगचा म्होरक्या आहे "सलमान हागा".
ह्या दोघांमधला संघर्ष सतत चालू असतो पण दर वेळी नायक कुटुंब खलनायकाला पार धुळीला मिळवत येते. बिचार्या खलनायकाला एकदा पण यशश्वी होऊन देत नाही. पण तरी पण तो बाकी कॉम्पिटिटर ला मारत मारत पुन्हा नायक संघाच्या समोर येऊन उभा ठाकतो. आणि शेवटच्या संघर्षाला सुरुवात होते.
पहिल्या एक तासात खलनायक धुमाकूळ घालतो. त्यांचे पंटर लोक "हरामजादा फरसाण" आणि "पकड सामान" गावात दहशद पसरवतात. नायकाचे दोन तीन लोक अडवायला जातात पण ते त्यांनाच धुतात. पण मग नायकाचा गँगचा एक माणूस ( चक्रवर्ती ) वरून येतो आणि "हरामजादा फरसाण" ला गारद करतो. थोडा धुमाकूळ थांबतो पण मग नायक संघाची माणसं फुल्ल जोश मध्ये घुसतात आणि जो येत त्याला तोडत सुटतात. नायक गॅंगचा "यादव" नावाचा किलर खलनायक अड्डयावर घुसतो आणि चार जणांना उडवतो त्याला परत "चक्रवर्ती" आणि "पटेल भाय" साथ देतात मग येतो नायक गॅंग चा "शार्प शुटर जस्सी". खलनायक गॅंग मध्ये एक लै बेकार अवलादीचा गुंड" असतो. त्याच नावं असतं "हारशील भोक ". जस्सी त्याला ठोकतो आणि त्याची सिग्नेचर स्टाईल मारतो. आधी वाटत असत कि आता खलनायक गॅंग गाव काबीज करणार पण नायक गॅंग सगळ्यांना लोळवून काढते आणि इंटरवल होते.
इंटर्वल नंतर पिक्चर टर्न घेतो. परत खलनायक गॅंग सापळा रचते आणि नायक गॅंग च्या ३ मोठ्या मेंबर ना मारते. त्यात नायक गॅंगचा म्होरक्या "सूर्या" आणि मेन फायटर "शर्मा" पडतो. सगळ्यांची हवा टाईट होते आता गाव जाणार हातातून वाटायला लागत अर्ध्या गावावर खलनायक गँगची सत्ता येते.
मग खऱ्या हिरोची एन्ट्री होते. "तिलक सामी" . तिलक सामी आणि संजू सामी दोघे भाऊ हळूहळू कारवाया करत गावात पाय जमवतात. जेव्हा खलनायक गॅंग परत घुसतात तेव्हा एक बायल्या खलनायक "अरबाट खटमल" संजू सामी गायब करतो. आम्ही बायल्यासारखी मान हलवतो. आता तिलक सामी एकटा पडणार , गाव लुटला जाणार असा वाटत असताना शिवम ची खतरनाक एन्ट्री होते . कॅमिओ रोल . फुल दंगा धुडगूस , बॅकग्राऊंड म्युजिक .
दोघे जण खलनायक गॅंग वर तुटून पडतात. शाहीन मशेरी ला कुटवून काळी करतात. त्यांचा अवतार बघून सुरुवातीला दोघांना मारणारा फहीम लंगडा लगेच लंगडा बनायची ऍक्टिंग करतो आणि शिवम ला मारतो. एक कॅरॅक्टर असं असत प्रत्येक पिक्चर मध्ये जे भाव खाऊन जात ते कॅरॅक्टर शिवमच. पहिल्या हाल्फ मध्ये जे बेकार अवलादीचं पात्र आहे (हारशील भोक) ज्याला जस्सी ने ठोकलेला असतो तोच फायनल बॅटल साठी तिलक सामी समोर उभा राहतो आणि तिलक सामी त्याला कुत्र्यासारखा सॉरी डुकरासारखा मारतो , धिंड काढतो.
पाठमागे फुल हेवी तुतारी आणि साऊथ च पार्श्वसंगीत. आणि शेवटला मुळशी पॅटर्न सारखा एक नवीन नवीन मुलगा येतो रिंकू फिनिशर आणि खलनायक गॅंग ला पुरा संपवतो फिनिश करतो. आजूबाजूला फुल्ल धमाके होत असतात. स्पार्किंग होत असत आणि त्यातून आपले दोन हिरो चालत येतात पिच्चर संपवून. पिच्चर संपतो . पण पुढे अजून स्टोरी दाखवतात . खलनायक गॅंग ला सपोर्ट करणारा पॉलिटिशन "नकटीला" जेल मध्ये टाकतात. आणि आख्खी नायक गॅंग एकत्र येऊन स्लो मोशन मध्ये चालत येते .
धिस इस सिनेमा ! प्युअर सिनेमा !
निर्माता जय जय शाह निर्मित आणि जी. गौतम दिग्दर्शीत
" विजय गर्जना- Victory Roar of India " पिच्चरची कहाणी सुफळ संपूर्ण.




0 टिप्पण्या