Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा गांधी - लहान मुलांसाठी मराठी भाषण / Mahatma Gandhi Speech for Kids

 


महात्मा गांधी - लहान मुलांसाठी मराठी भाषण

पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो , आज २ ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांचा जन्मदिवस.

 

संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण देणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा गांधीजी. सत्य आणि अहिंसेच्या जोरावर सुद्धा मोठ्यात मोठी लढाई जिंकता येते. असा महत्वाचा संदेश भारताच्या स्वातंत्र्य लढ्याने जगाला दिला. आणि अश्या ह्या शांततापूर्वक आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते होते " महात्मा गांधी" .

"एका डोळ्याच्या बदला म्हणून जर तुम्ही दुसरा डोळा घेतलात तर सारे जग आंधळे बनून जाईल" अश्या शब्दात गांधीजींनी शांततेचा पुरस्कार केला होता.

त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी तर आईचे नाव पुतळाबाई असे होते. त्यांच्या जन्म २ ऑक्टोबर १८७९ साली पोरबंदर ह्या ठिकाणी झाला. लहानपणा पासून गांधीजी थोडे लाजाळू होते. मितभाषी होते. जास्त कोणाशी बोलत नसतं. पण त्यांना वाचनाची फार आवड होती. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ते पुस्तके वाचायचे. त्याच्या घरचे वातावरण सुध्धा खूप धार्मिक होते. त्यामुळे "भगवतगीता" त्यांनी लहानपणीच वाचली होती.

 

त्यांच्या बालपणी त्यांची आई त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत असे पण त्यांना श्रावणबाळाची गोष्ट जास्त आवडायची. ते पण म्हणायचे की मोठा होऊन मी श्रावण बाळाप्रमाणे आई वडिलांची सेवा करणार. दुसरी त्यांची आवडीची गोष्ट म्हणजे राजा हरिश्चंद्रची गोष्ट. हरिश्चंद्र राजाचा सत्यासाठी सर्वस्व त्याग करण्याचा गुण त्यांना आवडला. त्यांनी ठरवले की आयुष्यभर आपण सत्य बोलायचे. लहानपणा पासून त्यांना शांतता, अहिंसा जास्त प्रिय होती. त्यांचा भाऊ त्यांच्या खोड्या काढायचा तेव्हा आई म्हणायची की तू पण त्याला त्रास दे. मार दे. पण गांधीजी म्हणायचे " तू आमची आई असून पण माझ्या भावाला मारण्यासाठी कशी सांगू शकतेस ? मी कधीही माझ्या भावाला मारणार नाही" असे होते शांतीप्रिय गांधीजी.

 

मोठे झाल्यावर गांधीजी शिकून बॅरिस्टर झाले. पण भारतात वकीलिमध्ये त्यांना फारसे यश आले नाही. मग ते एका खटल्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले. पण तिथे गेल्यावर त्यांना धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेत वर्णभेद खूप जास्त होता. माणसांमध्ये काळा गोरा असा भेदभाव केला जायचा. एकदा गांधीजींना गोऱ्या लोकांनी ट्रेन मधून उतरायला लावले. कृष्ण वर्णीय लोकांना युरोपियन लोकांसोबत सीट वर बसायला दिलं जायचं नाही. खाली बसायला लावायचे. गांधीजींचा सुध्धा खूप अपमान केला गेला. ती गोष्ट गांधीजींच्या मनाला खूप लागली. त्यांचा मनात विचार आला की भारतात परत निघून जावे. पण त्यांनी ठरवले की मी पळून नाही जाणार, माझ्या हक्कासाठी मी लढणार. त्यांनी तिथल्या कृष्ण वर्णीय लोकांना सोबत घेऊन वर्णभेदा विरुद्ध शांततापूर्ण आंदोलन केले. तिथल्या आफ्रिकन आणि भारतीय लोकांना त्यांचे हक्क मिळवून दिले. आजही दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना खूप मानले जाते ते या साठीच.

 

आफ्रिकेतून भारतात आल्यावर गांधीजी खूप व्यथित झाले. इंग्रजांचे सरकार तर होतेच पण भारतातल्या गरीब लोकांची अवस्था बिकट होती. शेतकरी अजून गरीब होत चालला होता. लोकांकडे अंगभर कपडे सुध्धा नव्हते. ते पाहून गांधीजींनी विचार केला माझ्या बांधवांना अंगभर कपडे नसताना मी पूर्ण कपडे का वापरू ? म्हणून त्यांनी फक्त धोतर आणि पंचा एवढेच कपडे वापरायचे ठरवले. इंग्रजांच्या अन्यायविरुद्ध तो पर्यंत भारतीयांनी आवाज उठवला होता. त्या स्वातंत्र्य लढ्याला लोकमान्य टिळक यांच्या नंतर महात्मा गांधी यांनी नेतृत्व दिले.

 

पण गांधीजींचे आंदोलन हे अहिंसक मार्गाचे होते. कोणत्याही प्रकारची हिंसा त्यांना मान्य नव्हती. मीठावर लावलेल्या कराच्या विरोधात त्यांनी दांडीयात्रा काढून मिठाचा कायदा मोडला. त्या यात्रेत लाखो लोक सहभागी झाले. इंग्रजांच्या विरोधात विदेशी मालावर बहिष्कार घालत त्यांनी स्वदेशी चा पुरस्कार केला. असहकार चळवळ चालू करून त्यांनी इंग्रजांना वेठीस धरले. गांधीजींची लोकप्रियता एवढी वाढली की इंग्रजांनी गांधींना तुरुंगात टाकल्यावर कामगार, शेतकरी, मजूर सर्व लोक उपोषणाला बसले.

 

गांधीजींचे भारतभूमीवर आणि इथल्या जनतेवर खूप प्रेम होते. गांधीजींच्या महान कार्यामुळे लोक त्यांना "बापू " म्हणू लागले. त्यांना "महात्मा" "राष्ट्रपिता" अश्या उपाधी मिळू लागल्या.  अहिंसा ,सत्य आणि स्वच्छता ह्या तत्वांवर त्यांचा खूप विश्वास होता. 

जगात जर तुम्हाला बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करा असा संदेश त्यांनी लोकांना दिला.

अश्या ह्या महान नेत्याला माझे कोटी कोटी नमन ! जय हिंद जय महाराष्ट्र ! 


अजून वाचा : इच्छापंख - गोष्ट एका भरारीची

लाल बहादूर शास्त्री - लहान मुलांसाठी मराठी भाषण

लोकमान्य टिळक - मराठी भाषण

१५ ऑगस्ट - मराठी भाषण

शिक्षक दिन - मराठी भाषण

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या