Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

बालपणाचा काळ सुखाचा | Joy of Childhood

 


बालपणाचा काळ सुखाचा


सर्वाना बालदिनाच्या शुभेच्छा. 


माणूस वयाने, कर्तृत्वाने, पैशाने कितीही मोठा झाला तरी ज्याला बालपणाची ओढ लागली नाही असा माणूस नाही. प्रत्येक माणसाच्या मनात एक छोटूस मुलं दडलेलं असत ते कधीही बाहेर येऊ शकत. गल्लीत किंवा बिल्डिंग खाली लहान मुलं क्रिकेट खेळत असतात आणी त्यांना बघून तुम्ही एक बॉल खेळायला मागता तेव्हा ते मुलं बाहेर यायला बघत. कोणी लहान मुलं रिमोट ची गाडी चालवत असले तर आपल्या मनातलं लहान मुलं बाहेर येऊन गाडी चालवायला बघत असत. सायकल चालवणाऱ्या लहान मुलांना बघून आपलं मन सायकलचा एक राऊंड मारून येत. कितितरी वेळा आपल्यातला तो खट्याळ पणा धडक मारून बाहेर यायला बघतो. कारण सर्वांच्या आयुष्यातला सुखद काळ म्हणजे "बालपण". 




ना कामाची चिंता, ना टार्गेट चा  दबाव, ना emi ची टांगती तलवार, ना लेटमार्क ची भीती. तेव्हा फक्त भीती होती मास्तरांच्या छडीची! पाढे पाठ करण्याची आणी नंतर पायथागोरास च्या प्रमेयाची. पण तेव्हा मन बिनधास्त होते. सोबत मित्रांची टोळी होती. तेव्हाचा आमचा सुपरहिरो होता "शक्तिमान". मोगली चे जंगल जंगल बात चली है पता चला है, चड्डी पेहनके फुल खिला है " हे आमचं एंथेम होतं. खरंच एक हाफ चड्डी घालून वर कोणता भेटेल तो शर्ट, टीशर्ट घालून आम्ही मोगली सारखे गावभर हिंडायचो. टायर चा गाडा, गोट्या, आबादुबी, लगोर, विटी दांडू, कपरी, हे आपले राष्ट्रीय खेळ होते. 



आमच्या पिढीचे लोक आपल्या मुलांचे खूप लाड करतात. त्यांना हवं नको ते देतात. काहीजनांना वाटत कि हे अति आहे. मुलांना प्रत्येक गोष्ट लगेच दिलीच पाहीजे असं नाही असं त्यांना वाटतं. पण ह्या लाडामागच खरं कारण कारण मानसिक असत. आपल्या जे मिळालं नाही ते आमच्या मुलांना मिळावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. खरंतर ते आपल्या मुलात आपलं बालपण शोधतात. माझ्या मुलीला मी रिमोट ची गाफिल घेतली तेव्हा मुलगी नसली घरात कि त्या गाडी सोबत माझी बायको नाहीतर मी खेळायचो. प्रत्येक आईला वाटतं कि जे मला नाही मिळालं ते माझ्या मुलीला मिळावं. कारण तिच्या अतृप्त इच्छा ती आपल्या मुलीच्या डोळ्यात शोधत असते.  मुलांचे कपडे, खेळणी, खानपान यावर त्यामुळे कोणतंच बंधन येत नाही. 


लहान मुलं म्हणजे निखळ निरागस आणि निष्पाप. अर्थात आजकालची मुले थोडी ऍडव्हान्स झाली आहेत. पण एकूणच लहान मुले क्युट असतात. आणी ह्या क्युटनेस मुळे आपण लहान मुलांसोबत असलो कि आपला वेळ आनंदात जातो. माझ्या मागच्या ब्लॉग "आनंदाच विज्ञान " ह्यात मी नमूद केल होतं कि लहान मुलांसोबत खेळण्याने आपल्या शरीरात oxytosin हे हार्मोन्स तयार होतं ज्याने मनाला आनंद मिळतो. मग आपल्या मनातलं लहान मुलं जिवंत ठेवलं तर आपल्याला किती आनंद मिळेल. झालेली भांडण लहान मुलासारखी विसरून जायची. लहान मुलासारखं कोणत्या गोष्टीच टेन्शन घ्यायचं नाही. राग, द्वेष, मत्सर, ह्या गोष्टी लहान मुलांना कुठे कळतात.  आपण पण नाही कळून घ्यायच्या. जाती भेद तर आमच्या नव्हताच नव्हता. हवं तेवढं खेळा मनाला मज्जा येते तोपर्यंत. म्हातारपणी परत लहान मुलासारखंच वागायला लागणार. मग आता का सोडा? 



आणी हो, तुमच्या लहान मुलांना त्याच बालपण जगू द्या, अभ्यास, क्लास, मार्क ह्यात त्यांना त्यांचं बालपण मिस करायला लावू नका. जगात स्पर्धा कधीच संपणार नाही. संपेल ते फक्त बालपण. त्या स्पर्धेच्या मृगजळपाठी धावताना मुलांचा बालपणाची हिरवळ हिसकावून घेऊ नका. 

- अव्यक्त अभिजीत 


अजून वाचा : बालपण देगा देवा - भाग १ 


टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या