Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

जेव्हा बालगणेश मुलांसोबत खेळतात .. | when Bal Ganesha playing with Kids

 

जेव्हा बालगणेश मुलांसोबत खेळतात ....

When Bal Ganesha playing with Kids... 

आज मंगळवार म्हणजे गणपती बाप्पाचा वार. त्यात आज ३१ डिसेंबर म्हणजे इयर एन्ड. सगळे धमाल करायच्या मूड मध्ये असणार. सगळीकडे खेळीमेळीचे आणि मस्ती करायचा मूड असणार. म्हणून म्हटलं आज आपल्या AI ला थोडं काम देऊया. 


बाप्पा सगळ्यात लाडका असतो लहान लहान बाळगोपाळांचा. बालगणेश चे चित्र ( bal ganesha Drawing ),  cute bal ganesh drawing,  bal ganesh images ह्या मध्ये लहान मुलांना भलताच इंटरेस्ट असतो. म्हणून मग मी AI ला सांगितलं कि " हे AI , bal ganesh playing with kids वाले Image जनरेट करा. AI ने ताबडतोब खालील फोटो तयार करून दिला.   


बालगणेश आणि आपली बच्चे कंपनी खेळायला लागली आणि मग धुंद होऊन गेली. बाप्पाच्या मागे पुढे पळून मुलांनी धुमाकूळ घातला. मग बाप्पा बोलला 

" अरे मी आलोय तर मला तुमचे खेळ शिकवा ना" 

" चालेल बाप्पा , चाल आपण क्रिकेट खेळूया " 

" अरे हा पण मला शिकवाल ना क्रिकेट" 

" अरे बाप्पा , सोप्प आहे हि बॅट घे आणि आम्ही टाकू त्या बॉल ला मार फक्त" 

" अरे वाह , हे तर सोप्प आहे. टाका बघू बॉल " 


मग काय बाल गणेश ने असे लांब लांब छक्के मारले कि मुलांचा बॉल आणून आणून घाम निघाला . एकट्या बाळ गणेश ने २०० धावा कुटल्या. 

मग मुले दमली. म्हणाली " बस बस्स गणेशा , तुला भारतीय क्रिकेट टीम मध्ये घ्यायला सांगतो" 

" ठीक आहे मित्रानो , मग आता दुसरा खेळ खेळू. " 

" ठीक आहे गणेशा , आता आपण लपाछपी खेळू" 

" अरे हा तर माझा आवडता खेळ आहे . कैलास पर्वतावर मी आणि मूषक आणि गण हा खेळ खूप खेळलो चला खेळूया" 

मग झाली लपाछपी ला सुरुवात. बाप्पा गेला झाड मागे लपायला . मुले लागली खुदुखुदू हसायला. बिचारा बाल गणेश झाड एवढुसं आणि गणेशा एव्हढा मोठठा. मुलांनी पकडलं बाळगणेशाला आणि "धप्पा" केला. 



बिचारा गणेश ! आलं राज्य त्याच्यावर. १०... २० ... ३० ... ४०... म्हणेपर्यंत मुले लपली जाऊन. एवढीशी मुले कुठे कुठे लपली गणेशा ला दिसेनात. मुले झाली खुश त्यांना वाटलं आपण काही बाप्पाला भेटणार नाही. पण मग गणेश ने आपल्या इटुकल्या पण तीक्ष्ण डोळ्यांनी मुलांना शोधायला सुरुवात केली. जानू , तनु , समु , परी , कुहू, शिवा , आरु , आदू , अनु , ओवी , धब्या , गब्या सर्वांना शोधलं. आता बिच्चारी झाली मुले. 


मग मुले म्हणाली " बाल गणेशा , बाप्पा चल आता फुटबॉल खेळू.  " 

"चला चला , मस्त मज्जा येईल खेळायला." बाल गणेशाने दुजोरा दिला. 

मग सुरु झाला फुटबॉल चा खेळ. बाप्पा एकटा विरुद्ध सगळी मुले.  आधी गणेशाने मारले दणादण गोल. 



मुले वैतागली. मग मुलांनी शक्कल लढवली. गणेशाच्या पायांमधून , मोठ्ठाल्या पोटाखालून बॉल पास करू लागले. बाळगणेशाला बॉल दिसेना . तशी मुलांनी आघाडी घेतली. खरतर बाप्पाने मुद्दाम बॉल सोडलं कारण मुले खुश होत होती. मग अचानक एक गोल अडवताना गणेशा  बॉल वर बसला. फटाक्कन आवाज आला आणि बॉल फुटला. 


मुले अशी पण दमली होती आणि गणेशा  पण घामाघूम झाला होता. आपल्या पंचाने घाम टिपत बाप्पा म्हणाला 

"दमलो बुवा , आता काहीतरी बैठा खेळ खेळू. "     

  " चल मग लुडो खेळूया " 

" ते कस खेळतात ? " गणेशाने ने निरागसपणे  विचारले . 

" तुम्ही कैलासावर द्यूत खेळता ना , पट खेळतात तसे , सोंगट्यानी " मुले म्हणाली. 

" हा हा , मला मज्जा येते खेळायला " गणेश म्हणाला. 

आणि मग लुडो चा डाव रंगला. 



तासभर खेळात होते. आधी तर गणेशा ला सहा पडेनात. मग बालगणेश ने जादू केली आणि पटापट सहा पडू लागले. कधी गणेशा  मुलांच्या सोंगट्या कापी तर कधी मुले गणेशाच्या. तासाभराने खेळ संपला. गणेश जिंकला. आणि नाचू लागला . मुले पण नाचू लागली. मग ठरलं कि "आंधळी  कोशिंबीर" खेळायचे. 



बाप्पाचे डोळे बांधले . वरून आकाशातून सर्व देव बाप्पाचा खेळ बघून अगदी हरखून गेले. 

मग सर्व मुले म्हणाली बाप्पा आता शेवटची एक धावण्याची शर्यत लावूया. 

धावण्याची शर्यत म्हटले तसे बालगणेश कावराबावरा झाला. नको नको म्हणू लागला. पण मुले कुठली ऐकायला. 

" नाही  नाही गणेशा , रेस तर खेळायचीच तू " 

आढेवेढे घेत बाळ गणेशा  तयार झाला. सर्वजण रांगेत उभे राहिले . शिट्टी वाजली आणि सर्व पळायला लागले. बालगणेश सुद्धा आपला तुंदील तनु सांभाळत पळू लागला. त्याच्या गोंडस शरीराला पळताना बघून मुलांना मज्जा आली. 



बघता बघता बाळ गणेश ने सर्वाना पाठी टाकले आणि शर्यत जिंकला . परत आनन्दाने नाचू लागला आणि मुले सुद्धा बालगणेश सोबत मस्त नाचू लागली. 

नाचून नाचून सर्व दमले घामाघूम झाले. मग ठरलं कि आता स्विमिंग पूल ला जायचे. मग काय निघाली सगळी मंडळी उड्या मारत , हसत खेळत. 

सर्वानी जाऊन स्विमिंग पूल मध्ये टणटण उड्या  मारल्या. बालगणेश ने पाण्यात उडी मारली तसे खूप पाणी बाहेर उडाले . मुले खो खो हसू लागली आणि बालगणेश सुद्धा खिदळू लागला. आपल्या सोंडेत पाणी घेऊन सर्व मित्रांवर पाण्याचे फवारे उडवू लागला. धम्माल चालू होती. 


आणि बघता बघता संध्यकाळ झाली.    

" चला मित्रानो , मला आता निघावे लागेल , पार्वती माता माझी वाट पाहत असेल." बालगणेश जड अंतःकरणाने म्हणाला. 

मुलांच्या डोळ्यात पाणी दाटले. अनंत चतुर्दशी ला होतात तशी मुले भावुक झाली. 

" थांब ना रे गणेश" 

" नको , आई रागावेल "

" पुन्हा येशील ना गणेशा ?"

" हो नक्की येईन. परत आपण धमाल करू " 

बाप्पा सर्व मित्रांना भेटून परत निघाला . सर्व मुले पाणावलेल्या डोळ्यांनी बाप्पाला बाय करू लागली . 

दोघांच्याही मनात आजच्या खूप साऱ्या आठवणी होत्या .   

 


अजून वाचा : जय हनुमान आणि AI

अजून वाचा : गणपती बाप्पा - AI फोटो



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या