"आठवणींचे घर "
बालपणीचे घर जन्माचे सुगंधित मातीचे
आई बाबा काका काकी, आत्या आजी आजोबा
अन
भावांडाच्या प्रेमाचे
कुटुंब जणू एक छताचे
वडिलांधारांच्या मानाचे
अन माझ्या अस्तित्वाच्या ठशांचे
किती सुख दुःख पाहिले त्या
तुलसी वृंदावनाने
अन
किती पावासाळे वाहिले
घराच्या मातेरी कौलाने
चांदण्यातील अंगण जणू
शुभ्र पाताळ नेसणारा हंस भासे
काळोख्या रात्रीत काजव्यांचे घर स्वर्ग दिसें
हळूच जाऊनी कुशीत आजीच्या
मायेची उब मिळे
वडीलकीचे घर बालपणीचे
एकंतात वाट माझी पाहे
पण ठाऊक नाही मज
कधी विसावतील अंगणात
माझी पाऊले
आजहि अगदी तिथवर जाणाऱ्या
वाटेला माझी आस लागे
वाटेच्या कडेला असणारी झाडे
घेऊन निरोप मंद झुळूक एक संगे
आठवणींच्या हिंदोळ्यावर घेई झोके
पाहुनी अंगणातल्या मातीच्या मनात
दिसें मला माझ्या बोबड्या पावलांचे ठसे
लहानपणीच्या रडण्याचे
अन
आता वाहणाऱ्या अश्रुंचे शब्द मात्र निराळे
न बोलताच काही उमळूनी गेले
दरातील फुल तगरीचे
कधी? फुलतील दारात अबोली
अन फुल मोगऱ्याचे
-व्यक्त
सिद्धेश घाग 😊
93560 19280
अजून वाचा : जन्माची गाठ बांधताना - मराठी कविता
0 टिप्पण्या