" धन्य जाहला जन्म आमचा "
धन्य जाहला जन्म आमचा
जन्मलो ह्या पावन भूमीवर
महाराजांच्या पराक्रमाने
भरून राहिला जिथंला चरचर ||
तेजस्वी तो सूर्य जन्मला
शिवनेरीच्या या भूमीवर
रक्षिण्या त्या रयतेला
जी अन्यायाने होती जर्जर ||
सह्याद्रीचा सिंह गरजला
दिल्ली पर्यंतच्या तख्तावर
स्वराज्याचे स्वप्न दाखवी
गुलामगिरी च्या वक्तावर ||
नरसिंह असा तो छत्रपती तो
स्वाभिमानी राजा तो कणखर
तलवारीची धाक एवढी
शत्रू नुसता कापे थरथर ||
कनवाळू तरी न्यायप्रिय तो
स्त्रीजातीचा करे जो आदर
गडपती तो सामर्थ्यशाली
रायगडावर त्याचा वावर ||
अहोभाग्य आपले हे जाणा
शिकवण त्यांची ठसवू मनावर
राजांचे हे नाव कोरुया
आपल्या हरेक श्वासावर
आपल्या हरेक श्वासावर ||
- अव्यक्त अभिजीत

2 टिप्पण्या
जबरदस्त
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा