Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

धन्य जाहला जन्म आमचा - शिवाजी महाराज कविता | SHIVAJI MAHARAJ POEM

 

" धन्य जाहला जन्म आमचा "


धन्य जाहला जन्म आमचा 
जन्मलो ह्या पावन भूमीवर
महाराजांच्या पराक्रमाने 
भरून राहिला जिथंला चरचर || 

तेजस्वी तो सूर्य जन्मला 
शिवनेरीच्या या भूमीवर 
रक्षिण्या  त्या रयतेला 
जी अन्यायाने होती जर्जर ||

सह्याद्रीचा सिंह गरजला 
दिल्ली पर्यंतच्या तख्तावर 
स्वराज्याचे स्वप्न दाखवी 
गुलामगिरी च्या वक्तावर ||

नरसिंह असा तो छत्रपती तो
स्वाभिमानी राजा तो कणखर 
तलवारीची धाक एवढी 
शत्रू नुसता कापे थरथर ||

कनवाळू तरी न्यायप्रिय तो 
स्त्रीजातीचा करे जो आदर 
गडपती तो सामर्थ्यशाली 
रायगडावर त्याचा वावर ||

अहोभाग्य आपले हे जाणा 
शिकवण त्यांची ठसवू मनावर 
राजांचे हे नाव कोरुया 
आपल्या हरेक श्वासावर
आपल्या हरेक श्वासावर ||

अव्यक्त अभिजीत 



टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या