Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

वेषांतर | Veshantar

वेषांतर | Veshantar




पूर्वीच्या काळी अनेक राजे महाराज आपल्या राज्यकारभाराबाबतीत फार दक्ष असायचे. आपली प्रजा कशी राहते ? आपल्या शासकीय निर्णयाचे प्रजेवर काय इफेक्ट होतात हे पाहायला खुद्द राजे महाराज वेषांतर करून फिरायचे . प्रजेत बेमालूम मिसळून लोकांच्या समस्या , त्यांचे वागणे यावर लक्ष ठेवायचे . खुद्द शिवाजी महाराज हे सुद्धा याला अपवाद नव्हते.

अशाच वेषांतराची सध्या आपल्याला गरज आहे

कधी तरी एखाद्या रेल्वे मंत्र्याने वेषांतर करून मुंबई लोकल चा प्रवास करावा . पहावं कधी तरी बदलापूर , डोंबिवली वरून ट्रेन पकडून , दिवा स्टेशन ला उभं राहून कधी स्लो लोकल पकडून बघावी वेषांतर करून . सकाळी . ४५ ला स्टेशन ला येऊन . १० ची बदलापूर लोकल पकडून बघावी.  कधी वाजता कॉम्पुटर वर बसून कोकणात जायला गणपतीची तिकीट बुक करून बघावी . कधी गणपती - मे  महिन्यात जनरल डब्ब्यात बसून चिपळूण पर्यंत तरी प्रवास करून बघावा !

कधी एखाद्या नगराध्यक्षाने वेषांतर करून ठाणे स्टेशन वरून वागळे  इस्टेट ला जाण्यासाठी रिक्षा पकडून बघावी , तीन हाथ नाक्याच्या ट्राफिक मध्ये वाढणाऱ्या मीटर चा आकडा बघावा . कधी बी केबिन ला शेअरिंग रिक्षेच्या अनंत रांगेत उभे राहून बघावे. कधी वेषांतर करून ला ऑफिस मधून निघून . ४१ ची बदलापूर पकडून बघावी.

कधी पाणी पुरवठा मंत्र्याने वेषांतर करून एखाद्या सोसायटीत जाऊन २० मिनटं  येणार पाणी बघावं. घरातली भांडी तरी पूर्ण भरुन होतात का ते पाहावं ! कधी दुष्काळी भागात जाऊन टँकर च्या लाईनीत उभा राहून बघावं वेषांतर करून.

कधी तरी एकाद्या शिक्षण मंत्र्याने वेषांतर करून मराठी शाळा जाऊन बघाव्यात. जमल तर विद्यार्थी मोजावेत .  कधी तरी वेषांतर करून आपल्या मुलासाठी सामान्य माणूस बनून एखाद्या कॉन्व्हेंट स्कूल मध्ये ऍडमिशन घ्यायला जावे.  पुस्तकं , गणवेश, स्कुल बस ह्यांचा खर्च बेतणारा आहे का बघावा .

एकाद्या गृह निर्माण मंत्र्याने वेषांतर करून सामान्य नागरिक बनून निदान बदलापूर ला तरी एखादा रूम किचन फ्लॅट खरेदी करता येतोय का पाहावं . बिल्डरच्या अतोनात थापा पचवून घर घेऊन त्याचे हफ्ते भरता येतात का पाहावं !

कधी आरबीआय च्या गव्हर्नर ने वेषांतर करून यावं आणि सामान्य गर्दीला रेपोरेट किती कळतो ते पाहावं . तुमच्या . पॉईंट ने वाढलेल्या दराने लोकांचे कर्जाचे हफ्ते किती हजारांनी वाढतात ते पाहावं.  पाहावं सामान्य माणसाने किती २००० च्या नोटा दडवून ठेवल्यात तांदळाच्या डब्ब्यात !

कृषी मंत्र्याला तर वेषांतर करून फिरायला वावच वाव आहे ! बघावं मिळत का सहज बियाणं , खत , शेतीला पाणी ! वेषांतर करून जावं आणि बघावं किती मिळतो शेत मालाला भाव .

गड  किल्ले संवर्धन समिती सदस्याने वेषांतर करून जावे आणि पाहावे महाराजांच्या वैभवाची आपण काय गत  करून ठेवली आहे.

कधी एखाद्या श्रम कल्याण मंत्र्याने वेषांतर करून एक सामान्य कॉर्पोरेट एम्प्लॉयी बनून जावं कामाला , बघावं CTC  आणि इन हॅन्ड मध्ये कितीची तफावत येते.     वेल ड्रेसेड बट स्ट्रेसेड म्हणजे काय ते पाहावं .

कधी एखाद्या आरोग्य मंत्र्याने वेषांतर करून एखाद्या शासकीय रुग्णालय दाखल व्हावं ! पाहावं किती दिवस जगायला जमत !

कधी एकाद्या वीज पुरवठा मंत्राने वेषांतर करून जावं जनतेत आणि पाहावं कि महिन्याला १० दिवस वीज नसून पण येणार बिल पाहून करंट बसतो का .

कधी तरी एकाद्या क्रिकेट खेळाडू ने वेषांतर करून बघावं कि अंतिम सामना हरल्यावर चाहत्यांना जेवण घश्याखाली उतरत का . 

कधीतरी एखाद्या राजकारण्याने वेषांतर करून यावे आणि मिसळावे आपल्या कार्यकर्त्यात. बघावे कोणता कार्यकर्ता आहे जमिनीशी नाळ असलेला . लोकांच्या मदतीला धावून जाणारा . कोण आहे नुसताच बॅनरबाजी करणारा .

- अव्यक्त अभिजित 


लोकलनामा - भाग ३ - एक अस्वस्थ वास्तव


टिप्पणी पोस्ट करा

15 टिप्पण्या

  1. खूप छान, खरोखर गरज आहे वेशांतराची

    उत्तर द्याहटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा