Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

लोकलनामा | Local Nama | Mumbai Local

लोकलनामा | Local Nama | Avyakta Abhijeet

लोकलनामा, Local Nama, Avyakta Abhijeet, Mumbai Local

मुंबई आणि मुंबईतले जीवन !
वेग.. धावपळ ... क्षणाचीही उसंत नसलेला प्रदेश म्हणजे मुंबई. 

कोणी तिला मायानगरी म्हणत तर कोणी जीवाची मुंबई म्हणत, राजकारणी लोकांना हीच मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटते. मुंबईत खूप पैसा आहे फक्त तो कमविण्याची अक्कल पाहिजे असे आपल्या पूर्वजांनी सांगून सांगून परप्रांतातली भरमसाठ लोकसंख्या मुंबईत आणून ठेवली. 

आणि खरंच मुंबई चा हा जो वेग आहे तो एका गोष्टीमुळे टिकून आहे ती गोष्ट म्हणजे मुंबई लोकल. मुंबई ची जीवन वाहिनी. मुंबई लोकल ही चाकरमान्यांसाठी लोकल गोष्ट नाही तर फार युनिव्हर्सल थिंग आहे. 
6.31 , 7.51, 7.59, 8.10 अशी युनिक नाव ह्या लोकल ची. घरातून निघालेल्या माणसांना ट्रेन पकडायची नसते त्याला 7.56, 8.10, 8.25 पकडायची असते. 

अश्या मुंबई लोकलने प्रवास करताना भेटतात मग एक एक नमूने हमसफर. काही ओळखीचे, काही अनोळखी... काही अनोळखी जे कालांतराने जिवश्च कंठश्च बनून जातात. 

मुंबईतले चाकरमानी आपल्या ट्रेन मध्यल्या मित्रांचे नंबर कधीच पूर्ण नावाने सेव्ह नाही करत... ते करतात ट्रेन च्याच नावाने..
अमित ६.४१ , पम्या 5.35 टिटवाळा, मन्या ८.१० बदलापूर, शिंदे ६.४१ बदलापूर...
जर कोणी ट्रेनच्या मित्रांची नावं अशी सेव्ह नसेल करत तर नक्कीच तो त्याचा मित्र च नाही असं समजायचं. बरं हा ट्रेनचा ग्रुप म्हणजे पण विलक्षण प्रकार आहे. 

ह्या ग्रुप ची स्थापना कधी होते, कोण करत या बद्दल कोणालाच पक्क सांगता येत नाही. दररोज एकच गाडीने, एकच जागी येणारी 6 डोकी एकमेकाशी बोलायला लागली की ग्रुप होऊन जातो आणि मग... चाकरमान्यांच्या आयुष्यातलं एक अविभाज्य घटक बनून जातो. 

मी घाटकोपर ला राहायला असताना एका ग्रुप मध्ये तर केवळ मनमोहन सिंह यांच्यावर टिप्पणी केली म्हणून ग्रुप मध्ये शिरकाव झालो. आज पंतप्रधान बदलले पण आमच्या त्या ट्रेन ग्रुप चे मित्र अजून पण माझ्या संपर्कात आहेत... मी आता त्या ट्रेन ला जात नाही तरी !

ह्या ट्रेन ग्रुप मध्ये सर्व प्रकारची व्यक्तिमत्त्व बघायला मिळतात. प्रत्येक ग्रुप मध्ये एक - दोन "बारक्या" असतात. २ "दादा" असतात. दोन एक "काका" असतात.  

आणि हे काका जे असतात ते सगळ्यात अवली असतात. ह्या काकांची वैशिठ्ये ठरलेली असतात. दुनिया घोळून पिलेले, बाकी सर्वांपेक्षा पाच पावसाळे जास्त पाहिलेलं, बहुतांश सरकारी कर्मचारी, कधीही गाडी न चुकवणारे, आणि मुख्य म्हणजे फाजील जोक मारायला नेहमी पुढे असणारे म्हणजे प्रत्येक ग्रुप चे काका. ते त्या ग्रुप ची जान असतात. 

मग येतात "बारक्या" कॅटेगरी. अंगयष्टी किरकोळ, उंची बेताची अशी लक्षणं दिसली की तो ग्रुप च बारक्या होऊन जातो. बहुतांश वेळी हा बारक्या अविवाहित असतो. सर्वाचा हमखास गिऱ्हाईक असणारे बारके ट्रेन पकडून जागा धरायला अतिशय तरबेज असतात. म्हणून त्यांना ग्रुप मध्ये विशेष मान असतो. बारक्या मित्र नेहमी पहिली जागा पकडतात आणि मग येणाऱ्या ग्रुप च्या काका, दादा यांना सीट देऊन त्यांच्या मांडीवर बसतात. 

प्रत्येक ग्रुप मध्ये दोन तीन असतात 'बाहुबली". त्यांना बघूनच त्यांच्या ग्रुप च्या नादाला जायला कोणाची हिम्मत नाही होत. हे बाहुबली असतात त्या ग्रुप च सुरक्षा कवच. पाठी राहिलेल्या ग्रुप मेंबर ना जागा करून पुढे आणायचं काम असतं ह्या बाहुबलींच! आणि कोणी नडला की मग आपल्या अजान बाहू च बळ दाखवायचं अलौकिक कौशल्य त्यांच्याकडे असतं.

मग ग्रुप मध्ये असतात "सप्लायर" . ह्याचं ग्रुप मध्ये विशेष महत्त्व असतं. नव्वद टक्के ग्रुप मेंबर चा प्रवास ह्या सप्लायर ने दिलेल्या "माला" वर अवलंबून असतो. ह्या मेंबर कडे अतिशय लेटेस्ट वेबसिरिज, मूव्ही असतात. त्याचं MX शेअर, Near by शेअर, अखंड चालू असतं. मागणी तसा पुरवठा ह्या नियम नुसार त्याला येणाऱ्या सर्व मागण्या तो पूर्ण करत असतो. काही वर्षांपूर्वी काही खास मेंबर "xxx" साठी खास प्रसिद्ध असायचे. 

मग ग्रुप मध्ये असतात " स्टँड अप कॉमेडियन". कोणत्याही विषयाला धरून पांचट जोक मारण्यात त्यांचा हातखंडा असतो. हमखास टाळ्या आणि लाफ्टर काढून देण्यात त्यांना महिरथ हासिल असते.  बारक्या त्यांचा सॉफ्ट टारगेट असतं.

अजून पण खूप प्रकारच्या वल्ली आहेत. त्यांच्या विषयी पुढच्या भागात.


आणखी वाचा -: हंबीरराव ताराराणी आणि मी

आणखी वाचा -: लोकलनामा - भाग २

टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या