Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

मैत्रीदिन चिरायू होवो भाग २ | Happy Friendship Day - Part 2

 

|| मैत्रीदिन चिरायू होवो ||

भाग  

 


समजा तुम्ही बाथरूम मध्ये आहात अचानक तुमचा फोन वाजतो.  तुम्ही बाथरूम मधूनच विचारता,

"कोणाचा कॉल आहे बघ "

बायको सांगते तुमच्या मित्राचा फोन आहे.

"असू दे वाजू दे उचलू नको"

तुम्ही बायकोला फोन उचलू देत नाही कारण तुम्हाला माहीत असतं की फोन उचलल्यास मित्र पहिला काय बोलणार !

ह्याला म्हणतात "मैत्री". आपला मित्र किती गुणांचा आहे हे  फक्त आपल्यालाच माहीत असतं. भले घरातल्या बाकी लोकांसमोर तो कितीही सोज्वळ, सज्जन असो, धुतल्या तांदळासारखा असो पण ते तांदूळ कोणत्या कोणत्या पाण्याने धुतले आहेत हे आपल्यालाच माहीत असतं.

माणसाचा स्वभाव फार विचित्र असतो. माणसाला आपल्या फॅमिली कडून आणि मित्रांकडून काय अपेक्षा असते माहितेय.

" फॅमिली ने आपल्याशी मित्रसारखे वागावे

आणि मित्राने फॅमिली सारखे !"

मलाही अशीच फॅमिली भेटत गेली आयुष्याच्या प्रत्येक वळणावर. आयुष्यात मुंबईच्या चाकरमानी लोकांना 3 प्रकारचे मित्र हमखास भेटतात ज्यांना ते नेहमी अंडर estimate करतात.

1. कामावरचे मित्र

2. शेजारी

3. ट्रेन चे मित्र

 

1. कामावरचे मित्र उर्फ सहकारी उर्फ Colleague :

साऊथ सिनेमात ज्यू. एन टी आर चा एक मूव्ही आहे "जनता गॅरेज". ह्या चित्रपटात एका प्रसंगात एक खूप मोठा उपदेश दिला आहे. तुम्ही दिवसातले आठ तास ऑफिसला असता. अख्खा दिवस तुम्ही सहकारयांसोबत असता. कुटुंबापेक्षा जास्त वेळ तुम्ही तुमच्या सहकारयांसोबत घालवता म्हणजे त्यांचं तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाचं स्थान आहे. अर्थात ऑफिस पॉलिटिक्स बाजूला ठेवलं तर खूप चांगले मित्र मिळू शकतात ऑफिस मध्ये. मी हे स्वतः अनुभवलं.

पहिल्या कंपनीत आम्ही - जन एकत्र जेवायला बसायचो. स्वतःच्या डब्ब्यापेक्षा दुसऱ्या च्या डब्ब्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट असायचा. माझा एक खास मित्र अमोल, शुध्द शाकाहारी. खूप सोफेस्टिकेटेड. कपड्याला एक चुरगळी आलेली चालायची नाही त्याला. डोक्याच्या सेट केलेल्या केसातला एक केस जरी वाकडा झाला तर तो अस्वस्थ व्हायचा. अतिशय strict. पण माझ्यासाठी तो सर्व नियम मोडायला तयार असायचा. किरकिर करणार पण मी सांगेन ते ऐकणार. तर अश्या ह्या अमोल जेवणाच्या पंगतीत आम्ही खूप पिडायचो. एकदा तर सगळ्यांनी मिळून त्याला जवळ जवळ उपाशीच ठेवलं होत.

 

माझा दुसरा मित्र बिपिन उर्फ बिपण्या. अतीशय भला आणि नेता माणूस. कबड्डीचा अफलातून खेळाडू. त्याची एक खासियत होती. समजा तुम्ही आणि तो दोघे वडापाव खाताय. एक एक वडापाव खाऊन झाला. त्याने दुसरा वडापाव घेतला. तुमचं पोट फुल्ल झालं. पण तुम्ही त्याच्याकडे एक बाईट मागितला. तो नाही देणार. भले एक अजून वडापाव तुम्हाला घेऊन देईल. पण त्याच्या वडापाव मधला बाइट तुम्हाला नाही मिळणार. जमायचंच नाही बापजन्मात! पण एक हाक मारा अडचणीत . असेल तिथून धावून येणार. माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळी मोठा बिकट प्रसंग ठाकला होता. तेव्हा बिपिन आणि मेघा वहिनी आम्हा उभयतांच्या मदतीला सांगता धावून आल्या.

 

अमोल, बिपिन, निलेश गोंधळेकर उर्फ नील्या , महेश देशमुख उर्फ मॅड आणि वैभव शिर्के उर्फ वॅबी, आणि मी असा आमचा चांडाळ सुपर सिक्स ग्रुप होता. आमचं सगळ्यात सॉफ्ट टार्गेट असायचा निल्या. अतीशय कमालीची सहनशक्ती असलेला हा माणूस म्हणजे गांधीजींच्या अहिंसा परमो धर्म चे मूर्तिमंत उदाहरण. पण त्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे.

मॅड म्हणजे मया आमच्यातला कलाकार माणूस. त्याला थिएटर करायचं होत पण तो कीबोर्ड वर अटकला. ज्या स्पीड ने तो टाईप करायचा 2- कीबोर्ड तोडून टाकायचा. एक खुर्ची पण त्याने तोडून टाकली.

वैभव आणि मी तर बालपणापासून एकत्र ! तो जोक आहे ना की मैत्री अशी करा की एकटे फिरलात तर लोक बोलले पाहिजेत दुसरा दलिंदर कुठे आहे. मी आणि वैभव तसे आहोत. आता आमच्या दोघांच्या ग्रुप ला आमची बायका आणि पोर पण ऍड झाली आहेत.

 

2. शेजारी उर्फ Neighborhood Friends:

दुसऱ्या अंडर इस्टीमेट मैत्रीचा प्रकार म्हणजे शेजार पाजार. म्हणजे माझ्या बाबतीत तर हा खूप चांगला अनुभव आला. विशेषतः डोंबिवली आणि आता बदलापूर ला.

डोंबिवली ला गणेशनगर ला राहायला असताना VK Gang शी माझा परिचय झाला. ही गँग युनिक आहे. पहिली त्या बिल्डिंग च्या जागी चाळ होती. मग तिथे रिडेव्हलपमेंट झाली आणि बिल्डिंग उभी राहिली. त्यामुळे तिथली तरुण मुलं ही सगळी लहानपणा पासून एकत्र वाढलेली. त्यामुळे त्यांचं बाँडींग जबरदस्त ! त्यांच्या गँग मध्ये माझी एन्ट्री कशी झाली आठवत नाही. पण नंतर सगळी गँग माझी खास झाली. कोविड मध्ये आम्ही जाम धमाल केली. शॉर्टफिल्म बनवून टाकली यूट्यूब वर. कुठून कुठून सोडून मच्छी आणली. पार्ट्या केल्या. शनिवारी रात्री आमच्या घरी गप्पांचा अड्डा जमायचा. माझ्या लेकीच्या एका वाढदिवसाला अख्ख्या गँग ने जाम धमाल केली होती. अनिकेत, गण्या, राक्या, विकास, सर्वेश, दीपिका, किशोर, सोनाली, मंदार, दीपेन, प्रफुल्ल, आनंद, टिंग्या सगळेच अवली आणि अतरंगी आणि तेवढेच सेन्सिटिव्ह.

 

हिथेच आमची ओळख गायकवाड कुटुंबाशी झाली. कल्पेश आणि भावना गायकवाड. काही लोकांशी आपले बंध अगदी नकळत जुळतात आणि त्यांचं रूपांतर गाढ मैत्रीत कधी होत काही कळतच नाही. कल्पेश आणि भावना सोबत आमचं तसच झालं. कल्पेश माझा चांगला मित्र झाला, भावना राधाची चांगली मैत्रीण झाली आणि त्यांची पिल्लू ध्वनी आमच्या जान्हवीची बेस्ट फ्रेंड झाली. खरतर जानूच्या जन्मानंतरच आमची घसमेट वाढली. जान्हवी आणि ध्वनी दोघी पण जवळ जवळ सामान वयाच्या. दोन्ही घरात मग ह्या चिमुकल्या पावलाची दुडदूड चालू झाली आणि दोन घर जवळ आली. कल्पेश तसा मितभाषी पण आपल्या मतावर ठाम आणि भावना बडबडी , अखंड ऊर्जेने भरलेली. दोन्ही फॅमिली चे कितीतरी सुखदुःखाचे क्षण आम्ही जगलो आणि अजूनही जगतोय. आम्ही बदलापूर ला आल्यावर आमची ताटातूट झाली. पण येणं जाणं चालूच आहे.

 

बदलापूर ला स्वतःचं घर घेतलं आणि  राहायला आलो. म्हटलं हिकडे कशी माणस भेटतील काय माहित. नवीन जागा , नवे लोक थोडा वेळ तर लागेल. पण श्या ! हिथे आलो आणि जणू काही गेल्या कित्येक वर्षापासून ओळखतो असे मित्र हिथे भेटले. गंमत अशी झाली की बिल्डर ने बिल्डिंग मध्ये पाण्याचा कनेक्शन ची बोंब करून ठेवलेली. मी राहायला जायच्या अगोदर एका मीटिंग ला वैतागून आवाज चढवला. झालं - जनाच्या नजरेत आलो आणि त्या मीटिंग मध्येच - ओळखी झाल्या. तोच धागा धरून पुढे ओळखी वाढत गेल्या आणि पुन्हा जन्मोजमीचे मित्र मिळाले.

ह्या ग्रुप ला मजबूत bonding व्हायचं मुख्य कारण म्हणजे क्रिकेट. फक्त क्रिकेट खेळण्यावरून हिथे लोक एकमेकाला जुडत गेले. बघता बघता ग्रुप झाला २५-३० जणांचा. मग क्रिकेट, बर्थ डे, दही हंडी, नवरात्री, भजन, पिकनिक, मोर्चे, सगळं केलं गेलं. एकी म्हणजे काय हे मी हिथे पाहिलं. क्रिकेट टुर्नामेंट असो की नवरात्री उत्सव की पाण्यासाठी मोर्चा आमच्या उत्सव ग्रुप ने एकदा एखादा विषय ठरवला की त्याचा कंडका पाडल्या शिवाय ग्रुप शांत बसत नाही. आमच्या घरच्या गणपतीला अगदी सार्वजनिक मंडळाच्या आरती सारखी "महाआरती" होते.

आमच्या उत्सव ग्रुप मध्ये पण हरहुन्नरी मित्र भरलेले आहेत. शनिवारी रात्री गप्पांच्या मैफिली झडतात. सणासुदीला भजन करतात. पण हे सगळं मज्जा मस्ती साठी असतं असं नाही. कोणाच्या घरी काही समारंभ असेल तर झाडून सर्व जण कामाला हजर असणार. कोणाला काही मदत लागली तर झाडून सर्व जण धावून जाणार. तुमच्या मनात कोणतही दुखः असू द्या, कितीही लपवून ठेवा एक ना एक जनाला त्याचा पत्ता लागतोच, आणि मग सर्वजण तुमच्या साठी धावून येणार. हिथे रुसवे फुसगे , नाराजी सुद्धा असते. पण तिचा जीव जास्तीत जास्त एक दोन दिवस टिकतो. तिसऱ्या दिवशी हि नाराजी मित्रांसमोर दम तोडते. अजून काय हवं  आपल्याला मित्रांकडून .

विशेष म्हणजे माझ्या सोबतच हिथे राधा आणि जानुचा सुध्धा मस्त ग्रुप बनलाय. त्या सुध्धा मस्त धमाल करतात.

 

3. ट्रेन चे मित्र :

मुंबईकरांचा अर्धा दिवस जातो कामावर आणि अर्धा दिवस जातो ट्रेन मध्ये . त्यामुळे मुंबईकरांसाठी जसे सहकारी मित्र महत्वाचे तसे हे ट्रेन चे मित्र सुद्धा महत्वाचे. माझ्या ट्रेन च्या मित्रांचे किस्से मी ह्या आधीलोकल नामा भाग एक " आणि "लोकलनामा भाग दोन" मध्ये सांगितले आहेतच. अशी संपत्ती मी मुंबईत आल्या पासुन गडगंज कमावली. घाटकोपर पासून ते टिटवाळा , कर्जत पासून ते बदलापूर, डोंबिवली , घाटकोपर पर्यंत ही माझी Assets विखुरलेली आहे.

 

एकूण काय तर मैत्री जुळण्यासाठी फक्त गुणच नाही तर अवगुण जुळले तरी पुष्कळ झालं. जेव्हा तुम्हाला मित्र " भावा , ऐक  ना" म्हणतात ना तेव्हा त्या भावा  मधला जो भाव आहे तो मनस्पर्शी असतो.   भले मित्र तुमची टांग खेचतील पण जेव्हा बाहेरचा कोणी तुम्हाला नडेल  तेव्हा हेच मित्र त्याच्या समोर उभे ठाकतील. 

जेवढे तुमच्या सुखात, तुमच्या यशात नाचतील त्याहून जास्त तुमच्या दुख्खात तुमच्यासोबत रडतील. म्हणून हि संपत्ती जास्त कमवा. तुम्ही आयुष्यात कधीच गरीब राहणार नाही.

- अव्यक्त अभिजीत 

अजून वाचा -  छत्रीनामा - The Umbrella Saga

  • Friendship Day 2025

  • Friendship Day wishes

  • Friendship Day quotes

  • Happy Friendship Day

  • Friendship Day messages

  • Best friends quotes

  • Friendship Day celebration ideas

  • Meaning of Friendship Day

  • Friendship Day gift ideas

  • Friendship Day story in Marathi

  • टिप्पणी पोस्ट करा

    1 टिप्पण्या

    1. खूप छान लेख लिहिला आहे. माझ्या आयुष्यात हाताच्या बोटावर मोजता येतील किंवा त्या पेक्षा कमी मित्रा आहेत आणि त्या नावमध्ये अभिजीत हे नाव कायम असणार आहे. माणसाच्या स्वभावावर अवलंबून असत की त्याच्या बरोबर किती माणस किंवा मित्रा जोडले जातात. आणि या बाबतीत तुमचा हात कोणीच धरू शकत नाही. तुम्ही तुमच्या बोलण्या वागण्यातून समोरच्या माणसाला आपलंसं करून टाकत आणि हा तुमच्या स्वभावातला सगळ्यात best part आहे

      उत्तर द्याहटवा