Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - लहान मुलांसाठी मराठी भाषण / Dr. Babasaheb Ambedkar Speech for Kids

 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी करायचे लहान मुलांसाठी भाषण. 

मित्र आणि मैत्रिणींनो ६ डिसेंबर रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असतो. त्या वेळी आपल्या छोट्या मित्रांना करण्यासाठी भाषण खाली देत आहे : 

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" 

मित्रानो, आपले आई वडील आणि आपले शिक्षक आपल्याला नेहमी सांगत असतात की खूप शिका आणि मोठे व्हा. पण नुसते खूप शिकलो आणि वयाने मोठे झालो त्याला अर्थ नाही. आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण इथल्या लोकांसाठी केला तर खऱ्या अर्थानं आपण मोठे होते. असच खर मोठेपण जगलेली व्यक्ती कोण माहितेय ? "भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर". असंख्य रंजल्या गांजलेल्या बहुजन लोकांसाठी आपल्या शिक्षणाचा खरा उपयोग त्यांनी केला. त्यांचे दुःख , दारिद्र्य आणि अज्ञान संपवण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली.  


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना "भारतीय संविधानाचे शिल्पकार" असेही म्हटले जाते. जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणजे आपल्या भारत देशाची लोकशाही. ती चालते ती बाबासाहेब यांनी लिहिलेल्या घटनेनुसार. 

१५ ऑगस्ट - भारतीय स्वातंत्र्य दिन - मराठी भाषण

बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे नाव "भिमराव सकपाळ" असे होते. त्यांचे एक शिक्षक होते " आंबेडकर" नावाचे त्यांनी आपले आडनाव बाबासाहेबाना दिले. बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. लहानग्या भीमाला लहानपणा पासूनच  शिक्षणाची खूप आवड होती. पण त्याकाळी जाती वरून भेदभाव केला जायचा आणि बाबासाहेबाना वर्गाच्या बाहेर बसून शिकावे लागे. खुप वाईट वागणूक दिली जायची. पण बाबासाहेब कधीही हिम्मत हरले नाहीत. सर्व अडचणी , त्रास सहन केला पण आपल्या शिक्षणावर कधीही परिणाम होऊ दिला नाही. 

एवढेच नाही तर पुढे जाऊन त्यांनी इतके शिक्षण घेतले की त्यांच्या नावासमोर डिग्री लिहायला जागा कमी पडू लागली. ते वकील होते, अर्थतज्ज्ञ होते , ते कायदेतज्ज्ञ पण होते. एवढा शिकलेला आणि सर्व गोष्टीत पारंगत असलेला नेता इतिहासात खचितच सापडेल.  

आपल्या दलीत बांधवांवर होणाऱ्या अन्यायाने  बाबासाहेब आंबेडकर अस्वस्थ होतं .  आपल्या दलीत बांधवांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला. बहुजन समाजाच्या लोकांसाठी शिक्षणाच्या सोयी मिळवून दिल्या. शिक्षणाने बहुजन समाजाच्या आयुष्यातला अंधार नक्कीच दूर होईल असा  त्यांना विश्वास होता.  पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी महाडला "चवदार तळ्याचा" सत्याग्रह केला.  दलीत बांधवांसाठी देवळाची दारे उघडावी म्हणून "काळाराम" मंदिरात सत्याग्रह केला. त्यांनी "मूकनायक" हया पाक्षिक ची सुरुवात केली. त्यातून त्यांनी बहुजन समाजाच्या वेदना लोकांपर्यंत पोहचवल्या. 


महात्मा गांधी - मराठी भाषण


भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी भारताची राज्यघटना लिहिली. महिला आणि कामगार वर्गासाठी कितीतरी चांगले कायदे केले. भारताची भूमी हि नररत्नांची खाण आहे असे म्हणतात. ह्यात भूमीत जन्माला आलेले आणि संपूर्ण जगाला शांतीचा महान मार्ग दाखवणारे "गौतम बुद्ध" ह्यांच्या विचारांनी बाबासाहेब भारावून गेले. शांतीचा प्रसार करणाऱ्या गौतम बुद्धाच्या "बौद्ध" धर्माचा मार्ग बहुजन समाजाला दाखवला. त्यांच्या महान कार्यामुळे त्यांना इ. स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला.


अश्या ह्या महान नेत्याचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. त्यांच्या आठवणीने सारा देश शोकाकुल झाला. बहुजन समाज पोरका झाला. 

 अश्या ह्या महान नेत्याला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माझे विनम्र अभिवादन!



अजून काही भाषणं: लोकमान्य टिळक - मराठी भाषण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या